लॉटरीच की! फक्त ९ हजारात मिळतोय सॅमसंगचा 'हा' 5G स्मार्टफोन; जाणून घ्या काय आहे फीचर्स?

Samsung Galaxy F14 5G Price in India: जर तुम्हाला कमी बजेटमध्ये 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला बहुतेक चीनी ब्रँड्सचे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. मात्र, आता तुम्ही सॅमसंग फोनही स्वस्तात खरेदी करू शकता.
सॅमसंग गॅलक्सी
सॅमसंग गॅलक्सीसॅमसंग

मुंबई : जर तुम्ही स्वस्त 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Samsung Galaxy F14 5G हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. सॅमसंगचा हा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तो खरेदी करू शकता.

Samsung Galaxy F14 5G ची किंमत-

हा सॅमसंग फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये येतो. तुम्ही Samsung Galaxy F14 5G हा स्मार्टफोनचं 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंट 8,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, तर 6GB रॅम + 128GB स्टोरेज असलेलं व्हेरियंट 9,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

या दोन्ही प्रकारांची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. तुम्ही फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि इतर ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून Samsung Galaxy F14 5G खरेदी करू शकता. या फोनसोबत सॅमसंग स्पॉटिफाय प्रीमियमचे (Spotify Premium) तीन महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?

Samsung Galaxy F14 5G मध्ये 6.6-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. ही स्क्रीन फुल एचडी+ रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येते. स्क्रीनच्या संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Exynos 1330 प्रोसेसरसह येतो.

हा स्मार्टफोन 4GB RAM + 128GB स्टोरेज आणि 6GB RAM + 128GB स्टोरेजसह येतो, मात्र मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येते. हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित OneUI Core 5.1 वर काम करतो.

हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअप-

यात 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. समोर, कंपनीने 13MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये तब्बल 6000mAh बॅटरी दिली असून ती 25W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी, स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in