Samsung New Phone: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज सर्वात प्रिमिअम गॅलॅक्सी एफ सिरीज स्मार्टफोन गॅलॅक्सी एफ५५ ५जी च्या लाँचची घोषणा केली. गॅलॅक्सी एफ५५ ५जी ची स्लीक व स्टायलिश आकर्षकता, तसेच प्रिमिअम वेगन लेदर फिनिश बॅक पॅनेल डिवाईसला लक्षवेधक बनवतात. गॅलॅक्सी एफ५५ ५जी सह सॅमसंग पहिल्यांदाच एफ-सिरीज पोर्टफोलिओमध्ये क्लासी वेगन लेदर डिझाइन असलेला स्मार्टफोन लाँच करणार आहे. गॅलॅक्सी एफ५५ ५जी सुपर एएमओएलईडी+ डिस्प्ले, शक्तिशाली स्नॅपड्रॅगन ७ जेन१ प्रोसेसर, ४५ वॅट सुपर-फास्ट चार्जिंग, अँड्रॉईड अपग्रेड्सचे चार जनरेशन्स आणि पाच वर्ष सिक्युरिटी अपडेट्स अशा सेगमेंट-अग्रणी वैशिष्ट्यांसह वरचढ ठरतो, ज्यामधून वापरकर्ते आगामी वर्षांसाठी नवीन वैशिष्ट्ये व सुधारित सुरक्षिततेचा लाभ घेऊ शकण्याची खात्री मिळते.
''गॅलॅक्सी एफ५५ ५जी सह सॅमसंग पहिल्यांदाच एफ सिरीजमध्ये क्लासी वेगन लेदर डिझाइनसह सॅडल स्टिच पॅटर्न सादर करणार आहे. क्लासी वेगन लेदर बॅक पॅनेलसह सॅडल स्टिच पॅटर्न व सोनेरी रंगामधील कॅमेरा डेकोमधून प्रिमिअम आकर्षकता दिसून येते. गॅलॅक्सी एफ५५ ५जी अॅप्रीकोट क्रश व रेझिन ब्लॅक या दोन आकर्षक रंगांमध्ये येईल. तसेच सुपर एएमओएलईडी+ १२० हर्टझ डिस्प्ले, शक्तिशाली स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसोबत ओएस अपग्रेडच्या चार जनरेशन्सचे अद्वितीय प्रॉमिस आणि पाच वर्ष सिक्युरिटी अपडेट्स व नॉक्स सिक्युरिटी अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह सॅमसंगची ग्राहकांना उच्च दर्जाचा अनुभव देण्याची क्षमता दिसून येते,'' असे सॅमसंग इंडियाच्या एमएक्स डिव्हिजनचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू पुल्लन म्हणाले.
क्लासी वेगन लेदर डिझाइन
गॅलॅक्सी एफ५५ ५जी या वर्षातील त्याच्या विभागामधील सर्वात सडपातळ वेगन लेदर स्मार्टफोन असणार आहे. अचंबित करण्यास डिझाइन करण्यात आलेल्या गॅलॅक्सी एफ५५ ५जी मध्ये क्लासी वेगन लेदर फिनिशसह अचूकतेसह तयार करण्यात आलेले अद्वितीय सॅडल स्टिच पॅटर्न आहे. कॅमेरा डेको सोनेरी रंगामध्ये येते आणि त्यामधून प्रिमिअमनेस दिसून येते. अॅप्रीकोट क्रश व रेझिन ब्लॅक या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या या स्मार्टफोनचे वजन फक्त १८० ग्रॅम आणि रूंदी अत्यंत स्लीक ७.८ मिमी आहे, ज्यामुळे वापरण्यास अत्यंत सुलभ आहे.
आकर्षक डिस्प्ले
६.७ इंच फुल एचडी+ सुपर एएमओएलईडी+ डिस्प्ले असलेला गॅलॅक्सी एफ५५ ५जी ग्राहकांना आकर्षक व्हिज्युअल्स आणि सुधारित व्युइंग अनुभव देतो. मोठ्या डिस्प्लेमध्ये १००० नीट्स उच्च ब्राइटनेस आहे आणि व्हिजन बूस्टर तंत्रज्ञान वापरकर्त्यांना प्रखर सूर्यप्रकाशात देखील त्यांचे आवडते कन्टेन्ट सुस्पष्टपणे पाहण्याची खात्री देते. १२० हर्टझ रिफ्रेश रेट तंत्रज्ञान-प्रेमी जनरेशन झेड व मिलेनियल ग्राहकांसाठी सोशल मीडिया सहजपणे स्क्रॉल करण्याची सुविधा देते.
शक्तिशाली प्रोसेसर
गॅलॅक्सी एफ५५ ५जी मध्ये ४ एनएम क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन१ प्रोसेसरची शक्ती आहे, ज्यामुळे वापरकर्ते सहजपणे मल्टी-टास्क करू शकतात. अल्टिमेट गती आणि ५जी कनेक्टीव्हीटीसह वापरकर्ते कुठेही पूर्णपणे कनेक्टेड राहू शकतात, जलद डाऊनलोड्सचा अनुभव घेऊ शकतात, सुलभपणे स्ट्रिमिंग करू शकतात आणि विनाव्यत्यय ब्राऊजिंगचा आनंद घेऊ शकतात. प्रोसेसर उच्च दर्जाचा ऑडिओ व व्हिज्युअल्ससोबत हाय-स्पीड कनेक्टीव्हीच्या माध्यमातून सुलभ मोबाइल गेमिंग अनुभव देते.
नाइटोग्राफी कॅमेरा
गॅलॅक्सी एफ५५ ५जी मध्ये हाय-रिझॉल्यूशन व कोणत्याही हालचालींशिवाय व्हिडिओज व फोटो कॅप्चर करण्यासाठी ५० मेगापिक्सल (ओआयएस) नो शेक कॅमेरा आहे, ज्यामुळे हात थरथरल्यामुळे किंवा नकळतपणे हालचालींमुळे फोटो ब्लर होण्याची शक्यता दूर होते. कॅमेरा सेटअपमध्ये ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेन्सर देखील आहे, गॅलॅक्सी एफ५५ ५जी मध्ये नाइटोग्राफी आहे, जे वापरकर्त्यांना अंधुक प्रकाशात देखील आकर्षक फोटो व व्हिडिओज कॅप्चर करण्याची खात्री देते, ज्याचे श्रेय बिग पिक्सल तंत्रज्ञानाला जाते. गॅलॅक्सी एफ५५ ५जी मध्ये ५० मेगापिक्सल हाय रिझॉल्यूशन फ्रण्ट कॅमेरा आहे, ज्यामधून आकर्षक व सर्वोत्तम सेल्फीज काढता येतात.
सुपर-फास्ट चार्जिंग
गॅलॅक्सी एफ५५ ५जी मध्ये ५००० एमएएच बॅटरी आहे, जी दीर्घकाळापर्यंत ब्राऊजिंग, गेमिंग व कन्टेन्ट पाहण्याचा आनंद देते. गॅलॅक्सी एफ५५ ५जी वापकरर्त्यांना कनेक्टेड राहण्याची, मनोरंजनाचा आनंद घेण्याची आणि विनाव्यत्यय उत्पानदक्षम राहण्याची सुविधा देतो. गॅलॅक्सी एफ५५ ५जी मध्ये ४५ वॅट सुपर-फास्ट चार्जिंग आहे, ज्यामुळे स्मार्टफोन कमी वेळेत पूर्णपणे चार्ज होतो.
गॅलॅक्सी एक्स्पेरिअन्स
गॅलॅक्सी एफ५५ ५जी मध्ये दर्जात्मक, डिफेन्स ग्रेड नॉक्स सिक्युरिटी असेल, ज्यामधून वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्टफोनमधील गोपनीयता व सुरक्षिततेसंदर्भात कोणतीही चिंता करण्याची गरज भासणार नाही. गॅलॅक्सी एफ५५ ५जी मध्ये सॅमसंगचे सर्वात नाविन्यपूर्ण सुरक्षितता वैशिष्ट्य सॅमसंग नॉक्स वॉल्ट देखील असेल. ही हार्डवेअर-आधारित सिक्युरिटी सिस्टम हार्डवेअर व सॉफ्टवेअर अॅटॅक्सविरोधात सर्वसमोवशक संरक्षण देते.
गॅलॅक्सी एफ५५ ५जी नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह ग्राहक अनुभवामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्यास सज्ज आहे, जसे वॉइस फोकस, जे आसपासचा आवाज कमी करत अद्भुत कॉलिंग अनुभव देते आणि क्विक शेअर वैशिष्ट्य, जे वापरकर्त्यांना दूर असताना देखील लॅपटॉप, टॅब अशा इतर कोणत्याही डिवाईसमधून त्वरित फाइल्स, फोटो व डॉक्युमेंट्स शेअर करण्याची सुविधा देते. तसेच, सॅमसंग गॅलॅक्सी एफ५५ ५जी सह ओएस अपग्रेड्सचे चार जनरेशन्स आणि पाच वर्ष सिक्युरिटी अपडेट्स देत ग्राहक समाधानाप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आहे, ज्यामधून वापरकर्ते आगामी वर्षांसाठी नवीन वैशिष्ट्ये व सुधारित सुरक्षिततेचा आनंद घेऊ शकण्याची खात्री मिळते.
मेमरी व्हेरिएण्ट्स, किंमत, उपलब्धता
गॅलॅक्सी एफ५५ ५जी फ्लिपकार्ट, Samsung.com आणि निवडक रिटेल स्टोअर्समध्ये ३ स्टोरेज व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल. तसेच, लिमिटेड पीरियड ऑफर म्हणून ग्राहक फक्त ४९९ रूपयांमध्ये ४५ वॅट सॅमसंग ट्रॅव्हल अॅडप्टर किंवा फक्त १९९९ रूपयांमध्ये गॅलॅक्सी फिट३ खरेदी करण्याचा आनंद घेऊ शकतात. गॅलॅक्सी एफ५५ ५जी च्या अर्ली सेलला २७ मे सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरूवात होईल.