४५ मिनिटांत लहान, मध्यम उद्योगांना मिळणार कर्ज; SBI चे नवे डिजिटल उत्पादन लाँच

पुढील पाच वर्षांत नफा आणि व्यवसाय वृद्धीसाठी एमएसएमईच्या कर्ज वितरणावर भर देण्यात येईल, असे देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने मंगळवारी सांगितले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : पुढील पाच वर्षांत नफा आणि व्यवसाय वृद्धीसाठी एमएसएमईच्या कर्ज वितरणावर भर देण्यात येईल, असे देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने मंगळवारी सांगितले. सरकारी बँक एसबीआयने ‘एसएमई (लहान आणि मध्यम उद्योग) डिजिटल बिझनेस लोन अर्थात डिजिटल व्यवसाय कर्ज नावाचे उत्पादन लॉन्च केले आहे. त्याअंतर्गत ४५ मिनिटांत कर्ज मंजूर केले जाईल.

पुढील पाच वर्षांमध्ये बँकेच्या वाढीसाठी एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) च्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण केले जाईल आणि पर्यायाने बँकेचा नफा वाढेल, असे एसबीआयने अधिकृत निवेदनात म्हटले आहे. पुढील महिन्यांत सर्व भागीदार ग्राहक सेवा पॉइंट टचपॉइंट्सवर आणि क्यूआर कोडद्वारे आउटडोअर टचपॉइंट्सवर उपलब्धता वाढवून आगामी महिन्यांत छोट्या व्यवसायांसाठी सहज कर्ज उपलब्धता वाढवण्याचे बँकेचे लक्ष्य आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी बँकेचे एकूण एसएमई कर्ज वितरण २० टक्क्यांहून अधिक वाढून ४.३३ लाख कोटी रुपये झाले आणि बुकमधील एकूण नॉन परफॉर्मिंग मालमत्ता आर्थिक वर्ष २० मधील ९.४३ टक्क्यांच्या कमाल पातळीवरून ३.७५ टक्क्यांवर आली.

बँकेचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन आम्ही सर्वात जलद कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे देशातील अग्रगण्य एमएसएमई कर्ज देणारी बँक म्हणून आमचे स्थान आणखी मजबूत होईल, असे बँकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी सांगितले. नवीन प्लॅटफॉर्म आयटीआर, जीएसटी रिटर्न्स आणि बँक स्टेटमेंट्स यांसारख्या स्त्रोतांकडून डेटा मिळवेल आणि आवश्यक तपशील दाखल केल्यानंतर १० सेकंदात मंजुरीचे निर्णय देण्यास सक्षम आहे. ५० लाखांपर्यंतच्या कर्जासाठी, एसबीआयने आर्थिक विवरणांची आवश्यकता माफ केली आहे, त्याऐवजी व्यवहार इतिहास आणि मूल्यांकनासाठी जीएसटी रिटर्नवर अवलंबून आहे, असे त्यात म्हटले आहे.

एसबीआयचे रिटेल बँकिंग आणि ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक विनय टोन्से म्हणाले की, बँक नवीन आणि विद्यमान एमएसएमई ग्राहकांसाठी एक अनोखा प्रस्ताव देत असून त्यात ४५ मिनिटांच्या आत तत्त्वत: मंजुरी दिली जाईल.

logo
marathi.freepressjournal.in