सेबीची हिंडेनबर्गला नोटीस, हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत अहवाल प्रकाशित होण्यापूर्वीच विकून नफा कमविला

अमेरिकेतील हिंडेनबर्ग संशोधन संस्थेने अदानी समूहाबद्दलचा अहवाल प्रकाशित होण्यापूर्वीच दोन महिने अगोदर तो न्यूयॉर्कस्थित मार्क किंगडम या हेज फंड मॅनेजरला देऊन नफा कमविला, असे सेबीने म्हटले आहे.
सेबीची हिंडेनबर्गला नोटीस, हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत अहवाल प्रकाशित होण्यापूर्वीच विकून नफा कमविला
प्रातिनिधिक फोटो
Published on

नवी दिल्ली : अमेरिकेतील हिंडेनबर्ग संशोधन संस्थेने अदानी समूहाबद्दलचा अहवाल प्रकाशित होण्यापूर्वीच दोन महिने अगोदर तो न्यूयॉर्कस्थित मार्क किंगडम या हेज फंड मॅनेजरला देऊन नफा कमविला, असे सेबीने म्हटले आहे.

सेबीने हिंडेनबर्गला याप्रकरणी ४६ पानी नोटीस पाठविली असून त्यामध्ये अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग संशोधन संस्था, न्यूयॉर्क हेज फंड आणि एक दलाल यांनी कोटक महिंद्र बँकेला अदानी समूहाच्या बाजारमूल्यापासून नफा मिळण्यासाठी कसे रोखले त्याचा सविस्तर तपशील दिला आहे. हिंडेनबर्गने संगनमताने बिगरसार्वत्रिक आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन अयोग्य पद्धतीने नफा कमविला, असा आरोप सेबीने केला आहे.

हिंडेनबर्गने सेबीच्या नोटिशीला प्रतिसाद देताना ती नोटीस जाहीर केली असून ही नोटीस म्हणजे भारतातील शक्तिशाली व्यक्तींनी केलेला घोटाळा उघड करण्याचा जे प्रयत्न करतात त्यांचा आवाज दाबण्याचा आणि त्यांना भीती दाखविण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in