जूनमध्ये प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत घसरण; डीलर्स संघटना ‘फाडा’ची माहिती

भारतातील प्रवासी वाहनांची विक्री जूनमध्ये तब्बल सात टक्क्यांनी घसरली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे वाहनांच्या शोरूमला भेट देऊन चौकशी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत तब्बल १५ टक्के घट झाल्याचा हा परिणाम आहे.
जूनमध्ये प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत घसरण; डीलर्स संघटना ‘फाडा’ची माहिती

नवी दिल्ली : भारतातील प्रवासी वाहनांची विक्री जूनमध्ये तब्बल सात टक्क्यांनी घसरली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे वाहनांच्या शोरूमला भेट देऊन चौकशी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत तब्बल १५ टक्के घट झाल्याचा हा परिणाम आहे. जून २०२३ मधील ३,०२,००० युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात (जून २०२४) एकूण प्रवासी वाहनांची नोंदणी २,८१,५६६ युनिट्स झाली, असे डीलर्सची संघटना ‘फाडा’ने शुक्रवारी सांगितले.

उत्पादनाची उपलब्धता वाढली आणि मागणी वाढवण्याच्या उद्देशाने भरीव सवलत असूनही मागणी घसरली. तीव्र उष्णतेमुळे आणि पावसाला विलंब झाल्याने शोरूमला भेट देऊन चौकशी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत तब्बल १५ टक्के घट झाल्याने परिणामी मागणीही घसरल, असे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (एफएडीए-फाडा)चे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

डीलरकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकांच्या चौकशीच्या प्रमाणात मोठी घसरण आणि वाहन खरेदीचा निर्णय पुढे ढकलणे यासारख्या आव्हानांचा फटका बसला आहे, असेही ते म्हणाले. प्रवासी वाहनांची यादी पातळी ६२ ते ६७ दिवसांपर्यंत सर्वकालीन उच्च पातळीवर पोहोचली आहे, असे सिंघानिया यांनी स्पष्ट केले. सणासुदीचा हंगाम अजून काही कालावधीनंतर सुरू होणार असल्याने प्रवासी वाहनांच्या मूळ उपकरण निर्मात्यांनी (OEMs) सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

सिंघानिया यांनी नमूद केले की, उच्च व्याजदरामुळे आर्थिक ताण कमी करण्यासाठी प्रभावी इन्व्हेंटरी व्यवस्थापन धोरण आवश्यक आहे. फाडा प्रवासी वाहन OEMs ला विवेकपूर्ण इन्व्हेंटरी नियंत्रण लागू करण्यासाठी आणि बाजाराशी सक्रियपणे संलग्न होण्यासाठी जोरदार आग्रह करते.

जूनमध्ये दुचाकींची नोंदणी वार्षिक ५ टक्क्यांनी वाढून १३,७५,८८९ युनिट्सवर पोहोचली आहे.

सिंघानिया म्हणाले की, अति उष्णतेसारख्या घटकांमुळे शोरूमला भेट देणाऱ्या १५ टक्के संभाव्य ग्राहकांनी शोरूमला भेट देऊन चौकशी केली नाही. पावसाला झालेला विलंब आणि लोकसभा निवडणुकीशी कारणांनी ग्रामीण भागातील विक्रीवर परिणाम होऊन मे महिन्यातील ५९.८ टक्क्यांवरून जूनमध्ये ५८.६ टक्क्यांवर घसरली. तर व्यावसायिक वाहनांची विक्री गेल्या महिन्यात ५ टक्क्यांनी घसरून ७२,७४७ युनिट झाली, जी जून २०२३ मध्ये ७६,३६४ युनिट होती.

मागील महिन्यात ट्रॅक्टरची विक्री २८ टक्क्यांनी घटून जूनमध्ये ७१,०२९ युनिट झाली. तर जूनमध्ये तीनचाकी वाहनांची नोंदणी ५ टक्क्यांनी वाढून ९४,३२१ युनिट्सवर पोहोचली असून मागील वर्षीच्या वरील महिन्यात ती ८९,७४३ युनिट्स झाली होती. जूनमध्ये एकूण किरकोळ विक्री वार्षिक आधारावर किरकोळ वाढून १८,९५,५५२ युनिट्स झाली.

सिंघानिया म्हणाले, उच्च तापमानाचा कृषी क्षेत्रावर होत असलेला परिणाम आणि पायाभूत प्रकल्प मंदावल्याचा फटका उद्योगाला बसत आहे, असेही ते म्हणाले.

जुलैमध्ये किरकोळ विक्री वाढीचा सावध आशावाद

व्यवसायाच्या दृष्टिकोनाबाबत फाडाने सांगितले की, दुचाकी वाहनांसाठी मान्सूनच्या आगमनानंतर चालना मिळण्याची अपेक्षा आहे, जरी कृषी रोख प्रवाहाची मर्यादा आणि अन्य आव्हाने कायम आहेत. दरम्यान, सध्याची मंदी असूनही, व्यावसायिक वाहन क्षेत्र नूतनीकरण केलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्प आणि हंगामी मागण्यांमुळे संभाव्य वाढीची अपेक्षा करते, असे त्यात म्हटले आहे. ३० हजारांपेक्षा जास्त डीलरशिप आऊटलेट्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फाडाने सांगितले की, सध्याच्या बाजारातील परिस्थितीच्या आधारावर जुलै वाहनांची किरकोळ विक्री उत्तम कामगिरी करण्याबाबत सावधपणे आशावादी आहे. देशभरातील १,७०० आरटीओपैकी १५६७ मधून जून महिन्यासाठी वाहन नोंदणी डेटा एकत्रित करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in