Shark Tank India: उद्योजकांनो व्हा तयार! शार्क टँक इंडियाने केली चौथ्‍या सीझनसाठी नोंदणीची घोषणा

Shark Tank India Season 4 Registration: टीव्ही शो शार्क टँक इंडिया सीझन ४ साठी नोंदणी सुरू झाली आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्याची प्रक्रिया जाणून घ्या.
Shark Tank India: उद्योजकांनो व्हा तयार! शार्क टँक इंडियाने केली चौथ्‍या सीझनसाठी नोंदणीची घोषणा

Shark Tank India 4 Registration: शार्क टँक इंडियाचे आत्तापर्यंत ३ सीझन झाले आहेत आणि आता चौथा सीझन लवकरच येणार आहे. याची माहिती देत शार्क टँक इंडियाने एक प्रोमो जारी केला आहे. प्रोमोमध्ये सांगण्यात आले आहे की, चौथ्या सीझनसाठी स्टार्टअप्सची नोंदणी सुरू झाली आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या स्टार्टअपची नोंदणी करायची असल्यास तुम्हाला काय करावे लागेल हेही त्यामध्ये सांगण्यात आले आहे.

शार्क टँक इंडियाचं कॅम्‍पेन

शार्क टँक इंडिया हा बहुप्रतिक्षित शो चौथ्‍या सीझनसाठी सज्‍ज आहे. यावेळी, कॅम्‍पेन ‘सिर्फ ड्रिम जॉब नही, अपने ड्रिम आयडिया के पीछे भागेगा इंडिया'मधून आपल्‍या स्‍वप्‍नांची पूर्तता करण्‍याची क्षमता व आवड असलेल्‍या स्‍टार्टअप्‍सचा, तसेच उद्योजकांचा देखील शोध घेण्‍याचा व्‍यापक दृष्टिकोन दिसून येतो. ही मोहिम सर्वसमावेशक दृष्टिकोनाला दाखवते, आपल्‍या नाविन्‍यपूर्ण संकल्‍पनांची पूर्तता करण्‍याचा निर्धार असलेल्‍या व्‍यक्‍तींना आवाहन करते. या सीझनचा पुन्‍हा एकदा देशभरात नाविन्‍यता व उद्योजकता उत्‍साहाला जागृत करण्‍याचा मनसुबा आहे. इच्‍छुक उद्योजक संधीचा फायदा घेण्‍यासाठी आणि टँकमध्‍ये सामील होण्‍यासाठी सोनी लिव्‍हच्‍या अ‍ॅपच्‍या माध्‍यमातून नोंदणी करू शकतात.

कसं करायचं रजिस्ट्रेशन?

तुम्हाला शार्क टँक इंडियासाठी तुमच्या स्टार्टअपची नोंदणी करायची असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला sharktank.sonyliv.com (https://shorturl.at/Fh07m) वर जावे लागेल. तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल, तो एंटर केल्यानंतर तुम्हाला OTP द्यावा लागेल आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमची पसंतीची भाषा निवडावी लागेल. तुम्हाला एकूण १२ पानांमध्ये तुमची आणि तुमच्या व्यवसायाची सर्व माहिती भरावी लागेल. हे सर्व केल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल.

शार्क टँक इंडियामध्ये या आधी रॉनी स्क्रूवाला (चित्रपट निर्माता-व्यावसायिक), रितेश अग्रवाल (ओयो रूम्सचे संस्थापक आणि सीईओ), दीपंदर गोयल (झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ), अझहर इक्बाल (इनशॉर्ट्सचे सह-संस्थापक आणि सीईओ) राधिका गुप्ता (एडलवाईस म्युच्युअल फंडचे एमडी आणि सीईओ) वरुण दुआ (संस्थापक आणि सीईओ ACKO) अमन गुप्ता, अमित जैन, अनुपम मित्तल, नमिता थापर, विनीता सिंग, अश्निर ग्रोव्हर आणि पियुष बन्सल यांचाही समावेश होता. यंदाच्या सिजनमध्ये कोण बाजी मारणार हे बघण्यासारखे असेल.

logo
marathi.freepressjournal.in