मुंबईतील सहा महिला मॅगीच्या अपना फूड बिझनेस २०२४ मध्ये चमकल्या!

मॅगी अपना फूड बिझनेस या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील विजेत्यांची नावे मॅगीतर्फे जाहीर करण्यात आली आहेत.
मुंबईतील सहा महिला मॅगीच्या अपना फूड बिझनेस २०२४ मध्ये चमकल्या!
freepik
Published on

मॅगी अपना फूड बिझनेस या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील विजेत्यांची नावे मॅगीतर्फे जाहीर करण्यात आली आहेत. महत्त्वाकांक्षी काँटेण्ट निर्मात्यांना कौशल्ये व ज्ञानाने सुसज्ज करून स्वत:चे फूड चॅनल उभे करण्याची तसेच ते तयार करत असलेल्या आशयातून (काँटेण्ट) पैसा मिळवण्याची क्षमता देणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. या पर्वात हा उपक्रम पाककलाविषयक काँटेण्ट तयार करणाऱ्या २ कोटी महत्त्वाकांक्षी क्रिएटर्सपर्यंत पोहोचला आणि ५०,००० सहभागी सदस्यांना स्वत:चे ऑनलाइन फूड चॅनल सुरू करण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये व अनुभव या उपक्रमाद्वारे प्राप्त झाला.

कबिता सिंग (कबिताजकिचन), मधुरा बाचल (मधुराजरेसिपी), तेजा पारुचुरी (विस्मई फूड्स), तनिष्का मुखर्जी (तन्हीर पाकशाला) यांसारख्या भारतातील काही प्रख्यात फूड इन्फ्लुएन्सर्ससोबत तसेच यूट्यूब व मेटाच्या तज्ज्ञांसोबत दोन महिने कसून प्रशिक्षण घेतल्यानंतर १० पात्र विजेत्यांना स्वत:चा काँटेण्ट व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बीज भांडवल प्रदान करण्यात आले. मुंबईच्या सोफिया मचाडो, श्रेया राव, त्राशिका दसेना, अशनीत कौर आनंद व शीतल पेडणेकर, कोलकात्याच्या प्रियंका कुंडु बिस्वास, तिरुअनंतपूरमच्या शैलजा नायर, पुण्याच्या पिंकी दासवानी, गुरूग्रामच्या वंदना जैन आणि मुंबई/हैदराबाद येथील बेनिशा मार्टिन यांनी या प्रतिष्ठेच्या यादीत स्थान मिळवले.

नेस्ले इंडियाच्या फूड बिझनेस विभागाचे संचालक रजत जैन या उपक्रमाबद्दल म्हणआले, “मॅगी अपना फूड बिझनेसच्या या पर्वातील विजेत्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. गेल्या अनेक वर्षांत मॅगी हा ब्रॅण्ड सक्षमतेचे, नवोन्मेषाचे व पाककलेच्या गौरवाचे प्रतीक म्हणून विकसित झाला आहे. स्वयंपाक करणाऱ्यांचा गौरव करण्याप्रती तसेच त्यांना मदत करण्याप्रती आमच्या बांधिलकीची आणखी एक पावती म्हणजे ‘मॅगी अपना फूड बिझनेस’ होय. त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यात वाटा उचलणे आमच्यासाठी अतीव आनंदाची बाब आहे. मी इंडिया फूड नेटवर्कमधील आमच्या सहयोगींबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो. मॅगी अपना फूड बिझनेसच्या अखंडित कार्यान्वयामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.”

गेल्या चार दशकांमध्ये मॅगीने असंख्य भारतीयांचे प्रेम व विश्वास कमावला आहे आणि नवोदित शेफ्सच्या पाककलेतील चौकसतेला प्रेरणा दिली आहे. आपल्या विस्तृत उत्पादनश्रेणीच्या माध्यमातून, लोकांच्या दैनंदिन आयुष्यात आनंद आणणारे पदार्थ तयार करण्याची क्षमता, मॅगीने स्वयंपाकी आणि फूडप्रेन्युर्सना दिली आहे. देश के लिए २ मिनिट उपक्रमाचा महत्त्वाचा घटक म्हणून बघितला जाणारा मॅगी अपना फूड बिझनेस अधिकाधिक सशक्त होत आहे. २०हून अधिक उगवत्या काँटेण्ट क्रिएटर्ससाठी हे आदर्श व्यासपीठ ठरले आहे. त्यांच्या प्रतिभेची जोपासना करण्यात तसेच नवोन्मेषाला उत्तेजन देण्यात या उपक्रमाने महत्त्वाचा वाटा उचलला आहे.

logo
marathi.freepressjournal.in