साबण ७-८ टक्के महागले; पाम तेलाच्या किमती वाढल्यामुळे प्रमुख एफएमसीजी कंपन्यांकडून दरवाढ

हिंदुस्तान युनिलिव्हर लि. (एचयूएल) आणि विप्रोसह प्रमुख एफएमसीजी कंपन्यांनी साबणाच्या किमती ७-८ टक्के वाढवल्या आहेत. पाम तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे नफ्यावरील परिणाम कमी करण्यासाठी कंपन्यांनी वरील निर्णय घेतला आहे. एचयूएल आणि टाटा कंझ्युमर यासारख्या कंपन्यांनी सध्या चहा किमती देखील वाढवल्या आहेत, कारण हवामानाच्या अनियमिततेमुळे उत्पादनात घट झाली आहे.
साबण ७-८ टक्के महागले; पाम तेलाच्या किमती वाढल्यामुळे प्रमुख एफएमसीजी कंपन्यांकडून दरवाढ
Published on

नवी दिल्ली : हिंदुस्तान युनिलिव्हर लि. (एचयूएल) आणि विप्रोसह प्रमुख एफएमसीजी कंपन्यांनी साबणाच्या किमती ७-८ टक्के वाढवल्या आहेत. पाम तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे नफ्यावरील परिणाम कमी करण्यासाठी कंपन्यांनी वरील निर्णय घेतला आहे. एचयूएल आणि टाटा कंझ्युमर यासारख्या कंपन्यांनी सध्या चहा किमती देखील वाढवल्या आहेत, कारण हवामानाच्या अनियमिततेमुळे उत्पादनात घट झाली आहे.

सप्टेंबर तिमाही निकाल जाहीर करताना अनेक सूचीबद्ध कंपन्यांनी साबणाच्या किमती वाढवण्याचा इशारा दिला, कारण त्यांना पाम तेल, कॉफी आणि कोको यासारख्या कच्च्या मालाच्या किमती वाढताना दिसत होत्या. साबणाच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या पाम तेलाच्या डेरिव्हेटिव्ह किमतीत यंदा ३० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे, असे विप्रो कंझ्युमर केअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज खत्री यांनी पीटीआयला सांगितले.

उद्योगातील सर्व प्रमुख कंपन्यांनी ७-८ टक्के दरम्यान किमती वाढविल्या आहेत. त्यामुळे या वाढीचा काही भाग कमी करता येईल. आमचे किंमत समायोजन या बाजाराच्या प्रवृत्तींशी जुळवले गेले आहेत, असे ते म्हणाले.

बाजारातील अग्रणी एचयूएलने देखील चहा आणि त्वचा स्वच्छ करणाऱ्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामध्ये डोव्ह, लक्स, लाईफबॉय, लिरील, पिअर्स, रेक्सोना इत्यादी ब्रँड्सच्या अंतर्गत साबणांचा समावेश आहे.

पाम तेलाच्या किमती १५ सप्टेंबरपासून सुमारे ३५-४० टक्के वाढल्या आहेत. कारण आयात शुल्कातील वाढ आणि जागतिक किमतीत वाढ झाली आहे. सध्या, पाम तेलाची किंमत सुमारे १,३७० प्रति १० किलो आहे.

logo
marathi.freepressjournal.in