अलीकडच्या काळात दुचाकी ही लोकांची सामान्य गरज बनली आहे. विशेषत: शहरात राहणारे लोक दैनंदिन वापरासाठी स्कूटीला प्राधान्य देतात. जर तुम्हीसुद्धा नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुझुकी एक्सेस 125 हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
नवीन Suzuki Access 125 विविध व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या स्कूटरच्या 'राइड कनेक्ट एडिशन - डिस्क' मॉडेलची ऑन-रोड किंमत (दिल्ली) 1,09,216 रुपये आहे. तुम्ही ही स्कूटर 10,000 रुपयांचं डाउन पेमेंट देऊन खरेदी केल्यास तुम्हाला 9.7% व्याजदरानं तीन वर्षांसाठी 3,187 रुपयांचा EMI भरावा लागेल.
Suzuki Access 125 'स्पेशल एडिशन - डिस्क' व्हेरियंटची ऑन-रोड किंमत 1,05,092 रुपये आहे. तुम्ही ही स्कूटर 10,000 रुपयांच्या डाउनपेमेंट भरून खरेदी केल्यास, तुम्हाला 3 वर्षांसाठी 9.7% व्याजासह 3,055 रुपये प्रति महिना EMI भरावा लागेल. तर Access 125 'डिस्क' मॉडेलची ऑन-रोड किंमत 1,02,714 रुपये आहे. तुम्ही 10,000 रुपये डाउन पेमेंट करून ही स्कूटर खरेदी केल्यास, तुम्हाला 9.7% व्याज दराने तीन वर्षांच्या कालावधीसाठी 2,979 रुपये मासिक EMI भरावा लागेल. ,
Suzuki Access 125 'Drum' प्रकाराची ऑन-रोड किंमत 97,137 रुपये आहे. तुम्ही ही स्कूटर 10,000 रुपये डाउन पेमेंट भरून खरेदी केल्यास, तुम्हाला 9.7% व्याज दरासह 3 वर्षांसाठी 2,799 रुपये प्रति महिना EMI भरावा लागेल.
सुझुकी एक्सेस 125 पॉवरट्रेन : नवीन Suzuki Access 125 स्कूटर 124 cc सिंगल सिलेंडर पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. हे इंजिन 8.7 PS कमाल पॉवर आणि 10 Nm पीक टॉर्क निर्माण करते. ही स्कूटर 45 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत मायलेज देते.
सुरक्षिततेसाठी, या स्कूटरमध्ये डिस्क/ड्रम ब्रेकचा पर्याय आहे. Access 125 मॉडेलमध्ये एलईडी हेड लाईट, सेमी डिजिटल इन्फॉर्मेशन पॅनल, सुझुकी राइड कनेक्ट यासह अनेक फीचर्स आहेत.
स्कूटरमध्ये फ्रंट टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन सेटअप देण्यात आला आहे. स्कूटरचं वजन 103 किलो आहे. भारतीय बाजारपेठेत सुझुकी ऍक्सेस 125 होण्डा एक्टिव्हा 125, टिव्हीएस ज्युपिटर 125 सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करते.