'या' कारवर भारतीय फिदा! ठरली देशातील सर्वात लोकप्रिय कार; काय आहे यशाचं रहस्य?

टाटा मोटर्सची 'ही' कार देशात का ठरली सुपरहीट? जाणून घ्या यशाचं सिक्रेट
'या' कारवर भारतीय फिदा!  ठरली देशातील सर्वात लोकप्रिय कार; काय आहे यशाचं रहस्य?
Published on

मुंबई: टाटा मोटर्सच्या कार सर्वोत्तम सुरक्षा फीचर्सनी सुसज्ज असतात. टाटाच्या नेक्सॉन, पंच, टियागो, हॅरियर, सफारी, अल्ट्रोज अशा सर्वच कार देशातील ग्राहकांची पहिली पसंती बनल्या आहेत. दरम्यान टाटानं अलीकडेच लॉन्च केलेली मायक्रो एसयूव्ही 'पंच' ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. जून 2024 मध्ये या कारची देशांतर्गत बाजारात 18,238 युनिट्सची विक्री झाली आहे. टाटा पंच एसयूव्हीमध्ये असं काय खास आहे, तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

परवडणारी किंमत: देशांतर्गत बाजारात, टाटा पंच मायक्रो-एसयूव्ही पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह येते. ICE-चालित पंचची किंमत 6.13 लाख ते 10.20 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

प्युअर आणि ॲडव्हेंचरसह अनेक प्रकार उपलब्ध आहेत. तुम्ही ॲटोमिक ऑरेंज, ट्रॉपिकल मिस्ट, डेटोना ग्रे यासह अनेक रंगांमध्ये टाटा पंच एसयूव्ही खरेदी करू शकता. तिची रचना खूपच आकर्षक आहे.

शक्तिशाली इंजिन: टाटा पंच SUV शक्तिशाली 1.2-लीटर पेट्रोल आणि CNG इंजिनसह सुसज्ज आहे. व्हेरियंटनुसार 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. तिचे पेट्रोलवर चालणारे मॉडेल 18.8 ते 20.09 किमी प्रति लिटर मायलेज देते.

तर CNG चालित व्हेरिएंट 26.99 किमी प्रति लिटर मायलेज देते. उत्कृष्ट मायलेजमुळे अनेकांना ती आवडते. याशिवाय कारमध्ये भरपूर जागा आहे.

अत्याधुनिक फीचर्स: नवीन टाटा पंच कारमध्ये 5 लोक आरामात दूरपर्यंत प्रवास करू शकतात. त्यात सामान नेण्यासाठी मोठी बूट स्पेस देण्यात आली आहे. या कारमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्ये: टाटा पंच उत्कृष्ट सुरक्षिततेसाठी ओळखली जाते. कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, टीपीएमएस (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम) आणि रियर-व्ह्यू कॅमेरा यासारखी अत्याधनिक वैशिष्ट्ये आहेत.

टाटा पंच EV : टाटा पंच EVच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, तिची किंमत 10.99 लाख ते 15.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. पंच ईव्ही स्मार्ट, स्मार्ट प्लस, ॲडव्हेंचर, एम्पॉवर्ड यासह अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

यात स्मार्ट सिंगल टोन, फियरलेस रेड ड्युअल टोन, डेटोना ग्रे ड्युअल टोन यासह 1 मोनोटोन आणि 5 ड्युअल टोन कलर पर्याय आहेत. नवीन पंच EV मध्ये 25 आणि 35 KWh चे बॅटरी पॅक आहेत. पूर्ण चार्ज केल्यावर ती अनुक्रमे 315 आणि 421 किलोमीटरची रेंज देते.

डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने तिचा बॅटरी पॅक केवळ 56 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज केला जाऊ शकतो. या इलेक्ट्रिक कारमध्ये 5 लोक आरामात बसू शकतात.

टाटा पंच EV मध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले, फुल-डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, सनरूफ यांसारखी वैशिष्ट्ये देण्यातआली आहेत. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज, ESP (इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम) आणि TPMS (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम) सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in