Tata Punch EV अन् Nexon EV सेफ्टीत नंबर वन! Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग

अलीकडेच टाटा पंच आणि नेक्सॉन इलेक्ट्रिक कारला भारतातील NCAP मध्ये क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.
Tata Punch EV अन् Nexon EV सेफ्टीत नंबर वन! Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग

Tata Punch EV आणि Nexon EV या देशांतर्गत बाजारात लोकप्रिय इलेक्ट्रिक कार आहेत. पंच EV टाटा मोटर्सने जानेवारी 2024 मध्ये लॉन्च केली होती. रेंज आणि फीचर्स व्यतिरिक्त या इलेक्ट्रिक कार सुरक्षिततेच्या दृष्टीनंही सर्वोत्तम आहेत. अलीकडेच टाटा पंच आणि नेक्सॉन इलेक्ट्रिक कारला भारतातील NCAP मध्ये क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.

टाटा मोटर्सच्या कार उत्कृष्ट सुरक्षा फीचर्ससाठी ओळखल्या जातात. आता या यादीत टाटा पंच ईव्ही आणि नेक्सॉन ईव्हीचाही समावेश करण्यात आला आहे. BNCAP क्रॅश टेस्टमध्ये दोन्ही कारनी चमकदार कामगिरी केली आहे.

टाटा पंच ईव्ही BNCAP क्रॅश टेस्ट: टाटा पंच ईव्हीने BNCAP क्रॅश टेस्टमध्ये ॲडल्ट ऑक्युपन्सी प्रोटेक्शन (एओपी) श्रेणीमध्ये 32 पैकी 31.46 गुण मिळवले आहेत. याशिवाय, चाइल्ड ऑक्युपन्सी प्रोटेक्शन (COP) विभागात 49 पैकी 45 गुण मिळाले आहेत.

पंच EV ने फ्रंटल ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये 16 पैकी 14.26 गुण आणि साइड मूव्हेबल डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये 16 पैकी 15.6 गुण मिळवले आहेत. सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, ABS, थ्री-पॉइंट सीट बेल्ट, ISOFIX माउंट सारखी फीचर्स आहेत.

Tata Nexon EV India NCAP क्रॅश टेस्ट: Nexon EV ला चाईल्ड आणि अडल्ट सेफ्टीच्या दृष्टीने 5 स्टार रेटिंग मिळालं आहे. Nexon EV ला अडल्ट ऑक्युपेन्सी प्रोटेक्शनमध्ये 32 पैकी 29.86 गुण मिळाले आहेत. तर चाइल्ड 49 गुणांपैकी 44.95 गुण मिळाले आहेत.

टाटा पंच EV ला BNCAP ने कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित कार म्हणून घोषित केलं आहे. आपल्या सेगमेंटमध्ये किफायतशीर असण्यासोबतच ही कार अनेक खास फीचर्सनी सुसज्ज आहे. भारतात तिची किंमत 10.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

टाटा पंच ईव्हीची फीचर्स: टाटा पंच इलेक्ट्रिक कार दोन बॅटरी पॅक पर्यायांसह येते. यामध्ये 25 kWh आणि 35 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकचा समावेश आहे. मध्यम श्रेणीसाठी, 25kWh बॅटरी उपलब्ध आहे, ही कार एका चार्जमध्ये 315 किलोमीटरची रेंज देते.

लाँग रेंज व्हेरियंट 35kWh बॅटरीसह येते. हे व्हेरियंट एका चार्जवर 421 किलोमीटरची रेंज कव्हर करेल. मीडियम रेंज व्हेरियंट 80bhp आणि 114Nm टॉर्क निर्माण करते, तर लाँग रेंज मॉडेल 120bhp आणि 190Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.

टाटा पंच EV फीचर्स: टाटा पंच इलेक्ट्रिक कारमध्ये मोठी 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, ती Apple CarPlay आणि Android Auto कनेक्शनसह सुसज्ज आहे. कारच्या अपडेटेड सेंटर कन्सोलला आता टच-सेन्सिटिव्ह एसी कंट्रोल पॅनल देखील मिळतो.

याशिवाय टाटा पंच EV ला टाटा लोगोसह नवीन टू-स्पोक स्टीयरिंग व्हील मिळते. या कारच्या आतील भागात ड्युअल-टोन अपहोल्स्ट्री, 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि AQI डिस्प्लेसह एअर प्युरिफायर आहे.

Tata Nexon EV ची फीचर्स: भारतीय बाजारपेठेत या कारची किंमत 14.49 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. यात 30kWh आणि 40.5kWh चे दोन बॅटरी पॅक आहेत. रेंज अनुक्रमे 325 किलोमीटर आणि 465 किलोमीटर आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, Tata Nexon EV मध्ये सहा एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटरिंग सिस्टम आणि फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स आहेत. केबिनमध्ये 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि सनरूफ सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in