टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; विविध प्रकल्पांवर चर्चा

टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी शनिवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी टाटा ट्रस्ट्स आणि सरकार यांच्यातील सहकार्यावर चर्चा करण्यात आली.
टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; विविध प्रकल्पांवर चर्चा
Published on

मुंबई : टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी शनिवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी टाटा ट्रस्ट्स आणि सरकार यांच्यातील सहकार्यावर चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण मुंबईतील अधिकृत निवासस्थानी झालेल्या या बैठकीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक्स या समाजमाध्यमावरून माहिती दिली. टाटा ट्रस्ट्स आणि महाराष्ट्र सरकार विविध प्रकल्पांवर एकत्र काम करून राज्याच्या विकासाला गती कशी देता येईल, यावर चर्चा झाली, असे त्यांनी म्हटले आहे. टाटा ट्रस्ट्स आणि राज्य सरकार यांच्यात मजबूत व दीर्घकालीन भागीदारी निर्माण करण्याबाबत विश्वास दाखविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नोएल टाटा यांचे आभार मानले.

नोएल टाटा यांनी गेल्या वर्षी टाटा ट्रस्ट्सच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांनी त्यांची जागा घेतली होती. टाटा ट्रस्ट्सकडे टाटा सन्सची ६६ टक्के हिस्सेदारी आहे. टाटा सन्स ही मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंतच्या उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आहे.

logo
marathi.freepressjournal.in