
नवी दिल्ली : करदात्यांनी दाखल केलेले आयटीआर आणि एआयएसमध्ये माहिती जुळत नसलेल्या करदात्यांसाठी मोहीम सुरू केल्याची माहिती सीबीडीटीने दिली आहे.
आटीआर दाखल करणाऱ्या करदात्यांना आणि आयटीआर न भरणाऱ्यांना २०२३-२४ आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी माहिती विवरण (AIS) आणि आयटीआरमध्ये उघड केलेले उत्पन्न आणि वार्षिक अहवालातील व्यवहारांमधील विसंगती सापडली असल्याबद्दल एसएमएस आणि ईमेल पाठवण्यात येत असल्याचे आयकर विभागाने मंगळवारी सांगितले.
एका निवेदनात, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) ने म्हटले की, त्यांनी ‘एआयएसमध्ये नोंदवलेले उत्पन्न आणि व्यवहार आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आणि २०२१-२२ प्राप्तिकर रिटर्न्स (आयटीआर) मध्ये उघड केलेल्या विसंगतींचे निराकरण करण्यासाठी करदात्यांना मदत करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मोहीम सुरू केली आहे.
सीबीडीटीने सांगितले की, या मोहिमेचा उद्देश ज्या व्यक्तींनी त्यांच्या आयटीआरमध्ये त्यांचे उत्पन्न पूर्णपणे उघड केले नसेल अशा व्यक्तींना आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी सुधारित किंवा विलंबित आयटीआर दाखल करण्याची ३१ डिसेंबर असल्याची आठवण करून देणे आणि मार्गदर्शन करणे हा आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ शी संबंधित प्रकरणांसाठी, करदाते ३१ मार्च २०२५ च्या मर्यादेपर्यंत अद्यतनित आयटीआर दाखल करू शकतात.
करपात्र उत्पन्न आहे किंवा त्यांच्या एआयएसमध्ये नोंदवलेले महत्त्वपूर्ण उच्च-मूल्य व्यवहार आहेत परंतु संबंधित वर्षांसाठी आयटीआर दाखल केलेले नाहीत, त्यांच्यासाठी ही मोहीम आहे. हा उपक्रम ई-व्हेरिफिकेशन स्कीम, २०२१ च्या अंमलबजावणीचा एक भाग आहे.
या मोहिमेचा एक भाग म्हणून एआयएस आणि आयटीआरमध्ये नोंदवलेल्या नोंदी व्यवहारांमध्ये जुळत नसल्याने करदात्यांना मेसेज किंवा इमेलने कळविण्यात येईल.