भारत दौरा टाळणारे मस्क चीनच्या दारी

टेस्ला या जगविख्यात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी नुकताच भारताचा दौरा टाळला. मात्र, रविवारी अचानक ते चीनच्या दौऱ्यावर दाखल झाले.
भारत दौरा टाळणारे मस्क चीनच्या दारी

बीजिंग : टेस्ला या जगविख्यात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी नुकताच भारताचा दौरा टाळला. मात्र, रविवारी अचानक ते चीनच्या दौऱ्यावर दाखल झाले.

गेल्या आठवड्यात मस्क यांनी भारताचा दौरा टाळला होता. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन भारतीय बाजारात प्रवेश करण्याची घोषणा करणार होते.

चीनचा विजेच्या वाहनांचा व्यवसाय हा जगातील दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता एलन मस्क हे चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यात ते पूर्ण स्वयंचलित वाहनांच्या सॉफ्टवेअरवर चर्चा करतील. तसेच स्वयंचलित वाहनांबाबत चीनने जमा केलेली माहिती अमेरिकेला हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

चिनी नियामकांच्या अटीनुसार, टेस्लाने २०२१ पासून शांघायमध्ये त्याच्या चिनी ताफ्याद्वारे संकलित केलेला सर्व डेटा संग्रहित केला आहे आणि तो अमेरिकेला पाठवलेला नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in