७१,७०० सोने विक्रमी, ३५० रुपयांनी वधारले; चांदी ८०० ने वाढून ८४ हजारांवर

एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, दिल्लीच्या बाजारात स्पॉट सोन्याच्या किमती (२४ कॅरेट) ३५० रुपयांनी वाढून ७१,७०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकावर बंद झाला. त्यामुळे विदेशी बाजारात तेजीचे संकेत आहेत, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले. .
७१,७०० सोने विक्रमी, ३५० रुपयांनी वधारले;  चांदी ८०० ने वाढून ८४ हजारांवर
Published on

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव सोमवारी विक्रमी पातळीवर पोहोचला. सोने सोमवारी ३५० रुपयांनी वाढून ७१,७०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. मौल्यवान धातूमध्ये सुरक्षित-गुंतवणुकीची मागणी वाढली आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे म्हणणे आहे. २०२४ मध्ये सोन्याच्या किमतींमध्ये आतापर्यंतची मोठी वाढ झाली असून ७,७०० रुपये प्रति १० ग्रॅमने महाग झाली आहे. मागील सत्रात सोन्याचा भाव ७१,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता.

चांदीचा भावही ८०० रुपयांनी वाढून ८४,००० रुपये प्रति किलोचा नवा उच्चांक गाठला. मागील व्यवहारात हा दर प्रतिकिलो ८३,२०० रुपये होता.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, दिल्लीच्या बाजारात स्पॉट सोन्याच्या किमती (२४ कॅरेट) ३५० रुपयांनी वाढून ७१,७०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकावर बंद झाला. त्यामुळे विदेशी बाजारात तेजीचे संकेत आहेत, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले. .

आंतरराष्ट्रीय बाजारात, कॉमेक्स येथे स्पॉट गोल्ड २,३३६ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते, मागील बंदच्या तुलनेत ७ अमेरिकन डॉलरने वाढ झाली. व्यापाऱ्यांनी यूएस नोकऱ्यांच्या उत्साहवर्धक अहवालाकडे लक्ष दिले नाही आणि त्याऐवजी काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या सराफाच्या वाढीवर लक्ष केंद्रित केले. यामुळे सोमवारी सोन्याच्या भावाने आणखी एक विक्रमी उच्चांक गाठला, असेही गांधी यांनी सांगितले.

एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी संशोधन विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले, सोन्याच्या किमतीचा चढता आलेख राहणार आहे. ते २,३५० अमेरिकन डॉलर प्रति औंसवर पोहोचले.

logo
marathi.freepressjournal.in