तीन आठवड्यांपासून एकही आयपीओ बाजारात नाही

२०२४ मध्ये मोठ्या प्रमाणावर आयपीओ बाजारात आले असले तरी गेल्या काही महिन्यांपासूनच्या शेअर बाजारातील नकारात्मक वातावरणामुळे गेल्या तीन आठवड्यांत एकही आयपीओ खुला न झाल्याने नवीन कंपन्यांचे सूचीबद्ध होण्याचे प्रमाण बंदावले आहे.
तीन आठवड्यांपासून एकही आयपीओ बाजारात नाही
Published on

नवी दिल्ली : २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणावर आयपीओ बाजारात आले असले तरी गेल्या काही महिन्यांपासूनच्या शेअर बाजारातील नकारात्मक वातावरणामुळे गेल्या तीन आठवड्यांत एकही आयपीओ खुला न झाल्याने नवीन कंपन्यांचे सूचीबद्ध होण्याचे प्रमाण बंदावले आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये १६ कंपन्या सूचीबद्ध झाल्याच्या तुलनेत जानेवारीमध्ये केवळ पाच आणि फेब्रुवारीमध्ये चार कंपन्या सार्वजनिक झाल्यामुळे आयपीओ बाजारात येण्याचे प्रमाण मंदावले आहे. क्वालिटी पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट लिमिटेड हा अलीकडील आयपीओ आणला, जो १४ फेब्रुवारी रोजी तीन दिवसांच्या बोलीसाठी उघडला गेला होता. तथापि, कमीत कमी तीन कंपन्यांनी - Advanced Sys-tek, SFC Environmental Technologies, आणि Viney Corporation - यांनी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये त्यांचे ड्राफ्ट पेपर्स काढून आयपीओ योजना मागे घेतल्याने गती मंदावल्याचे दिसते.

टाटा कॅपिटल आयपीओ मसुदा दाखल करणार ?

नवी दिल्ली : वित्तीय सेवा कंपनी टाटा कॅपिटल बाजार नियामक सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे दाखल करण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्सचे टाटा कॅपिटलमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर प्रस्तावित आयपीओमध्ये ताज्या इश्यूद्वारे २.३ कोटी इक्विटी शेअर्स आणि काही विद्यमान भागधारकांद्वारे ऑफर ऑफ सेल (ओएफएस) यांचा समावेश असेल, असे शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. तसे झाल्यास कंपनीचे मूल्य सुमारे ११ अब्ज अमेरिकन डॉलर होणे अपेक्षित आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) च्या अंतिम आदेशाची प्रतीक्षा आहे, जो या आर्थिक वर्षाच्या (आर्थिक वर्ष २५) अखेरीस येण्याची अपेक्षा आहे, असे सूत्रांनी सांगितले. मसुदा कागदपत्रे दाखल करण्यासंदर्भात टाटा कॅपिटलला पाठवलेला ईमेल अनुत्तरित राहिला.

logo
marathi.freepressjournal.in