घसरत्या ठेवींवर SBI चा उपाय; सरकारी बँकेची मुदत ठेवींसह एसआयपीची योजना

सातत्याने कमी होत जाणाऱ्या ठेवींवर स्टेट बँकेने नवा उपाय शोधून काढला आहे.
घसरत्या ठेवींवर SBI चा उपाय; सरकारी बँकेची मुदत ठेवींसह एसआयपीची योजना
(संग्रहित छायाचित्र, PTI)
Published on

नवी दिल्ली : सातत्याने कमी होत जाणाऱ्या ठेवींवर स्टेट बँकेने नवा उपाय शोधून काढला आहे. ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी स्टेट बँकेने आवर्ती ठेव आणि एसआयपीचे कॉम्बो उत्पादन सादर करण्याच्या तयारीत आहे.

नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करण्याच्या स्थितीत बँक असल्याचे संकेत स्टेट बँकेचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी दिले आहेत. कोणताही ग्राहक हा जोखमीच्या मालमत्तेत रक्कम गमावू इच्छित नाही. तुलनेत बँकेतील विविध उत्पादने ही नेहमीच त्याच्या प्राधान्याचा भाग राहिली आहेत. म्हणूनच आम्ही त्यांना आकर्षित करणारी उत्पादने आणण्याचा प्रयत्न करत आहोत, असे शेट्टी यांनी सांगितले.

शेट्टी म्हणाले की, रिकरिंग डिपॉझिटसारख्या काही पारंपारिक उत्पादनांमध्ये नावीन्य आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ही प्रत्यक्षात एक पारंपारिक एसआयपी असेल. आम्ही मुदत ठेव/आवर्ती ठेव आणि एसआयपी असे दोन्ही एकत्रही होऊ शकते.

दिवसाला ६० हजार बचत खाती सुरू होणार

स्टेट बँकेने नवीन खाती सुरू करण्यावर भर दिला असून दिवसाला जवळपास ६० हजार बचत बँक खाती सुरू होत आहेत. एकूण मुदत ठेवींपैकी जवळपास ५० टक्के रक्कम केवळ डिजिटल यंत्रणेद्वारे जमा केली जात असून अनेक खाती डिजिटल माध्यमातून सुरू केली जात आहेत. स्टेट बँक पुढील ३ ते ५ वर्षात १ लाख कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय वित्तीय कंपनी बनण्याचे लक्ष्यही यानिमित्ताने जाहीर करण्यात आले. बँकेचा ६१,०७७ कोटी रुपये नफा आहे.

logo
marathi.freepressjournal.in