महामार्गावरून टोलनाके होणार गायब, 'या' खास टेक्नॉलॉजीचा होणार वापर, नितीन गडकरींचा झक्कास प्लॅन

नवीन ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) आधारित टोल व्यवस्थापन प्रणालीमुळे NHAI चे उत्पन्न किमान 10,000 कोटी रुपयांनी वाढेल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
महामार्गावरून टोलनाके होणार गायब, 'या' खास टेक्नॉलॉजीचा होणार वापर, नितीन गडकरींचा झक्कास प्लॅन
Published on

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) FASTag आधारित टोल संकलन प्रणालीला GPS आधारित प्रणालीसह बदलणार आहे. त्यामुळं वाहनांना टोल प्लाझावर थांबण्याची आवश्यकता नाही. नवीन ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) आधारित टोल व्यवस्थापन प्रणालीमुळे NHAI चे उत्पन्न किमान 10,000 कोटी रुपयांनी वाढेल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

नव्या प्रणालीसाठी NHAI निविदा काढत असल्यानं या वर्षाच्या अखेरीस ही प्रणाली कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. आगामी GPS आधारित प्रणालीचे उद्दिष्ट टोल प्लाझावरील वाहतूक कोंडी कमी करणे आणि राष्ट्रीय महामार्गावरील भौतिक टोल बूथ काढून टाकणे आहे. त्यामुळे या भागांतून वाहनांना थांबावं लागणार नाही. NHAI ने GNSS आधारित टोल व्यवस्थापन प्रणालीचं काम करू शकतील, अशा जागतिक कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. भारताच्या राष्ट्रीय महामार्ग 50,000 किमी नेटवर्कपैकी दोन वर्षांत कव्हर करण्याचं NHAIचं लक्ष्य आहे.

सुरुवातीला, GNSS आधारित प्रणाली सध्याच्या FASTag इकोसिस्टमसह एक हायब्रिड मॉडेलच्या माध्यमातून काम करेल. याचा अर्थ रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) आणि GNSS या दोन्ही तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. व्हर्च्युअल टोल बूथच्यामाधून टोलनाक्यांवर येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांचा मागोवा घेण्यासाठी केला जाईल आणि GNSS आधारित टोल संकलनासाठी समर्पित लेन तयार केल्या जातील.

ही नवीन प्रणाली GNSS तंत्रज्ञानाचा वापर करून वाहने व्हर्च्युअल टोल बूथमधून जाताना त्यांच्याकडून ऑटोमॅटीक टोल शुल्क वसूल करेल. अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि सुरक्षित टोल संकलन पद्धत प्रदान करण्यासाठी ही प्रणाली डिझाइन केली गेली आहे.स्वयंचलित प्रणालीमुळे टोल वसुलीत मानवी चुका आणि भ्रष्टाचाराचा धोका कमी होतो, ज्यामुळे सरकार आणि चालक दोघांनाही अधिक विश्वासार्ह पद्धत मिळेल.

logo
marathi.freepressjournal.in