Top EV Cars : शहरांतील रस्त्यांसाठी परफेक्ट आहेत 'या' ५ इलेक्ट्रिक कार, किंमतही बजेटमध्ये...

आज आम्ही तुमच्यासाठी भारतीय शहरांतील ट्रॅफिकच्या रस्त्यांवर बेस्ट परफॉर्म करू शकतील अशा काही इलेक्ट्रिक वाहनांची माहिती घेऊन आलो आहोत.
इलेक्ट्रिक कार
इलेक्ट्रिक कार टाटा मोटर्स

मुंबई : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणपूरक तर आहेतच शिवाय इंधनाचीही बचत करतात.

आज आम्ही तुमच्यासाठी भारतीय शहरांतील ट्रॅफिकच्या रस्त्यांवर बेस्ट परफॉर्म करू शकतील अशा काही इलेक्ट्रिक वाहनांची माहिती घेऊन आलो आहोत. 15 लाखांपेक्षा कमी किंमतीत या कार तुम्ही खरेदी करू शकता.

एमजी कॉमेट (MG Comet EV) : एमजी कॉमेट इलेक्ट्रिक कार ही एक झक्कास कार आहे. तिची सुरुवातीची किंमत 6.99 लाख रुपये आहे. एका चार्जवर ती 230 किलोमीटरपर्यंत धावू शकते. ही एक कॉम्पॅक्ट कार आहे, परंतु आतमध्ये बसण्यासाठी भरपूर जागा आहे.

ही कार शहरांतील ट्रॅफिक तसेच पार्किंग इत्यादी गोष्टी समोर ठेवून डिझाइन केलेली आहे. त्यामुळे शहरात वापरण्यासाठी ती एक उत्तम पर्याय असू शकतो.

या कारचे पाच मॉडेल्स आहेत - एक्झिक्युटिव्ह, एक्साइट, एक्साइट एफसी, एक्सक्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह एफसी. कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी दिवे आणि क्लाउड कनेक्टिव्हिटी देखील आहेत.

टाटा पंच (Tata Punch EV): टाटा पंचची किंमत 10.99 लाख ते 15.49 लाख रुपये आहे. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 315 ते 400 किलोमीटर धावू शकते.

या कारमध्ये व्हॉईस कमांडने उघडणारे सनरूफ, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम ज्यामध्ये वायरलेस पद्धतीन अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले ऑपरेट करता येतील. यासोबतच पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे.

टाटा टिआगो (Tata Tiago EV) : टाटा मोटर्स ही भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेतील एक विश्वासार्ह कंपनी आहे. कंपनीची टिआगो इव्हीसारखी ही कार 7.99 लाख रुपये सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. ही कार पूर्ण चार्ज केल्यावर 315 किलोमीटरपर्यंत धावू शकते.

ही कार चार मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये XE, XT, XZ+ आणि XZ+ Tech Lux यांचा समावेश आहे. तसेच, ही कार दोन बॅटरी पॅक पर्यायांसह खरेदी केले जाऊ शकते.

Citroen eC3: या कारची सुरुवातीची किंमत 11.61 लाख रुपये आहे आणि ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 320 किलोमीटरपर्यंत धावू शकते, असा दावा कंपनीनं केला आहे. कारची बॅटरी क्षमता 29.2kW आहे, जी दैनंदिन कामांसाठी आणि ऑफिसला जाण्यासाठी बेस्ट आहे.

ही कार DC फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते. याचा अर्थ 10% ते 80% पर्यंत चार्ज होण्यासाठी तिला एका तासापेक्षा कमी वेळ लागतो. अशा परिस्थितीत ती तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

वर दिलेली इलेक्ट्रिक वाहने परवडणाऱ्या किमतीत खरेदी करता येऊ शकतात. शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणं केवळ पर्यावरणासाठी फायदेशीर नाही तर त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावरही होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in