अबब! तब्बल 22 लाख रुपयांची बाईक...नेमकं काय आहे खास?

BMW S 1000 XR: 22 लाख रुपयांच्या या सुपरबाईकमध्ये काय खास आहे? खरेदी करण्यापूर्वी संपूर्ण तपशील जाणून घ्या
BMW S 1000 XR
BMW S 1000 XRBMW

मुंबई: लक्झरी दुचाकी उत्पादक BMW Motorrad ने अलीकडेच आपली नवीन BMW S 1000 XR बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने ही बाईक 22.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत सादर केली आहे.

जर तुम्ही सुपर स्पोर्ट्स बाईक्सचे शौकीन असाल आणि तुम्हालाही सुपर स्पोर्ट्स बाईक घ्यायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज आपण BMW S 1000 XR बाइकची माहिती घेणार आहोत.

डिझाइन: नवीन BMW S 1000 XR बाईक अतिशय प्रॅक्टिकल आणि स्पोर्टी डिझाइनसह सादर करण्यात आली आहे. बाईकचे डिझाइन मुख्यत्वे BMW S 1000 RR वरून प्रेरित आहे. या नवीन लक्झरी BMW S 1000 XR बाईकमध्ये शार्प बेझलसह स्प्लिट एलईडी हेडलाइट आहे.

बाईकमध्ये आकर्षक बॉडीवर्क पाहायला मिळते. अपडेटेड स्पोर्ट टूरर बाईक असल्याने तिच्या सीटची उंची आधीच वाढवण्यात आली आहे. याशिवाय बाइकची लांबी आणि रुंदी वाढवण्यात आली आहे जेणेकरून ती चालवण्यासाठी अधिक आरामदायक होईल.

शक्तिशाली इंजिन: नवीन BMW S 1000 XR बाईक 999cc इनलाइन चार सिलेंडर इंजिनसह सुसज्ज आहे. हे इंजिन 170 bhp पॉवर आणि 114 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

या बाईकमध्ये रेन, रोड, डायनॅमिक आणि डायनॅमिक प्रो असे चार राइड मोड आहेत. नवीन BMW S 1000 XR बाईक अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. कलर टीएफटी, एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, इंजिन ब्रेक कंट्रोल यांसारखी फिचर्स आहेत.

सस्पेंशन आणि ब्रेकिंग: नवीन BMW S 1000 XR बाईकच्या सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर, बाईकमध्ये USD फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक सेटअप स्टॅबिलायझर आहे. ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर ड्युअल फ्रंट आणि रियर सिंगल डिस्क ब्रेक आहेत.

रंग पर्याय: BMW S 1000 XR बाईक लाइट व्हाइट, ब्लॅक स्टॉर्म मेटॅलिक आणि ग्रॅव्हिटी ब्लू मेटॅलिक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनी या बाइकला पर्यायी M पॅकेजसह कस्टमाइझ करण्याचा पर्यायही देत ​​आहे.

परफॉर्मन्स: नवीन BMW S 1000 XR बाईक 3.25 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग वाढवते. BMW च्या या नवीन सुपरबाईकचा टॉप स्पीड 253 किलोमीटर प्रति तास आहे.

ट्रॅक रायडिंग आणि ट्रेल रायडिंगसाठी, बाइकमध्ये पूर्णपणे पुनर्रचना केलेली सीट बसवण्यात आली आहे. ही सीट पूर्वीपेक्षा खूपच आरामदायी आहे. ही सीट आता 850 मिमी उंच आहे, तसेच बाईकला चांगला ग्राउंड क्लीयरन्स देखील आहे.

logo
marathi.freepressjournal.in