पर्यटन क्षेत्रातील दिग्गज केसरी पाटील यांचे निधन; वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : पर्यटन क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे तसेच केसरी टूर्सचे संस्थापक केसरीभाऊ पाटील यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सूना, दोन मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून रविवारी त्यांचावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
पर्यटन क्षेत्रातील दिग्गज केसरी पाटील यांचे निधन
पर्यटन क्षेत्रातील दिग्गज केसरी पाटील यांचे निधनX - @Kesari_Tours
Published on

मुंबई : पर्यटन क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे तसेच केसरी टूर्सचे संस्थापक केसरीभाऊ पाटील यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सूना, दोन मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून रविवारी त्यांचावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

वयाच्या ५०व्या वर्षी त्यांनी ‘पर्यटक देवो भव:’ या संकल्पनेतून १९८४ साली ‘केसरी टूर्स’ची स्थापना केली आणि मुंबईत कुटुंबासह स्थायिक झाले. केसरी टूर्सची एक जगविख्यात कंपनी म्हणून ‘केसरी’चे नाव घेतले जाते. केसरी पाटील यांना पर्यटन क्षेत्रातील एक विद्यापीठ म्हणून ओळखलं जात होतं. अथक परिश्रम आणि कठीण संघर्षातून त्यांनी ‘केसरी टूर्स’ला एका वेगळ्या उंचीवन नेऊन ठेवलं. त्यांचा वारसा कन्या वीणा पाटील यांनी पुढे नेला.

मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांनी वेगळी वाट निवडत ‘वीणा वर्ल्ड’ची स्थापना केली. पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील मथाने गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात १९३५ साली जन्मलेल्या केसरी पाटील यांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी ‘केसरी टूर्स’ची स्थापना केली. सध्या कंपनीच्या देशासह जगभरात शाखा आहेत. पर्यटन क्षेत्रातील अनमोल योगदानासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांना पर्यटन क्षेत्रातील चालतेबोलते विद्यापीठ म्हणून संबोधले जायचे. त्यांच्या निधनाने विविध क्षेत्रांसह पर्यटन क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पर्यटन क्षेत्रातील उद्यमीला मुकलो – मुख्यमंत्री

पर्यटन क्षेत्रातील संधीची ओळख करून देणारा, महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारा उद्यमी म्हणून उद्यमशील केसरीभाऊ पाटील यांचे नाव सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. “उद्योग-व्यवसायाच्या एखाद्या नव्या क्षेत्रात उतरून, त्यामध्ये नाव कमावून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची क्षमता पाटील यांनी आपल्या अंगी असलेल्या व्यवस्थापन आणि उद्मोजकतेच्या कौशल्याच्या जोरावर सिद्ध केली.

logo
marathi.freepressjournal.in