मुंबई: बाइक्ससोबतच स्कूटरलाही भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. बहुतेक लोक दैनंदिन वापरासाठी स्कूटरला प्राधान्य देतात. विशेषत: महिलांमध्ये स्कूटर खूप लोकप्रिय आहेत, कारण त्या मोटरसायकलपेक्षा 'गियरलेस' आणि चालवण्यास सोप्या असतात. मुलांना शाळेत सोडणे, खरेदी आदी सर्व कामांसाठी महिला स्कूटरला प्राधान्य देतात.
तथापि, देशांतर्गत बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश स्कूटर 125 सीसी क्षमतेच्या आहेत, शिवाय त्या वजनानंही जड आहेत. महिलांना अशा स्कूटर चालवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत बहुतांश महिला हलक्या स्कूटरच्या शोधात असतात.
म्हणूनच, आज आम्ही तुमच्यासाठी टीव्हीएसच्या एका लोकप्रिय स्कूटरची माहिती घेऊन आलो आहोत, जी वजनानं हलकी असून उत्कृष्ट मायलेज देते. ही स्कूटर खास महिला रायडर्स आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे.
टीव्हीएस स्कूटी पेप प्लस स्कूटरबद्दल (TVS Scooty Pep Plus):
आम्ही टीव्हीएस स्कूटी पेप प्लस स्कूटरबद्दल (TVS Scooty Pep Plus) बोलत आहोत. ही सध्या वृद्ध आणि महिलांसाठी अधिक उपयुक्त स्कूटर आहे. भारतीय बाजारपेठेत या स्कूटीची किंमत 63,060 ते 66,160 रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.
ही स्कूटर मॅट ब्लॅक, मॅट ब्लू यांसह अनेक आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. नवीन TVS Scooty Pep Plus स्कूटरमध्ये 87.8 cc पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 5.43 PS कमाल पॉवर आणि 6.5 Nm पीक टॉर्क निर्माण करते.
50 किमीपर्यत उत्कृष्ट मायलेज-
इंधन कार्यक्षमतेबद्दल बोलायचं झाल्यास ही स्कूटर प्रति लीटर 50 किमी पर्यंत मायलेज देते. नवीन टीव्हीएस स्कूटी पेप प्लस स्कूटरमध्ये हॅलोजन हेडलाइट, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल), ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट कन्सोल, साइड स्टँड अलार्म, यूएसबी चार्जिंग पोर्ट यासह अनेक फीचर्स आहेत.
TVS स्कूटी पेप प्लस स्कूटीचे वजन फक्त 93 किलो आहे, त्यात 4.2-लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे. या स्कूटरच्या सस्पेन्शन सेटअपबद्दल बोलायचं झालं, तर समोरील भागात टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेन्शन सेटअप देण्यात आला आहे.
सुरक्षिततेसाठी या स्कूटरमध्ये ड्रम ब्रेकचा पर्याय आहे. यात 10 इंची अलॉय व्हील्स आहेत. तसेच, 135 मिमी ग्राउंड क्लीयरन्स आणि सीटची उंची 760 मिमी आहे. TVS स्कूटी पेप प्लस ही भारतीय बाजारपेठेत Hero Pleasure स्कूटरशी स्पर्धा करते.