
नवी दिल्ली : २०२५ च्या सुरुवातीचे काही महिने मंदावल्यानंतर प्राथमिक बाजारात पुनरुज्जीवनाचे संकेत दिसत आहेत. स्थिर होत असलेल्या दुय्यम बाजारामुळे आणि भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे पुढील तीन ते सहा महिन्यांत डझनभर कंपन्यांनी त्यांचे आयपीओ लाँच करण्याची तयारी केली आहे, असे मर्चंट बँकर्सनी सांगितले.
भांडवल बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँकेची उपकंपनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), कल्पतरू, रुबिकॉन रिसर्च, ऑल टाइम प्लास्टिक्स, रेग्रीन-एक्सेल ईपीसी इंडिया आणि पॅरामेसु बायोटेक यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
याव्यतिरिक्त, क्रेडिला, एसके फायनान्स, व्हेरिटास फायनान्स, पारस हेल्थकेअर, सीआयईएल एचआर सर्व्हिसेस, अवान्से फायनान्शियल सर्व्हिसेस, ड्रॉफ-केटल केमिकल्स इंडिया, ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्स आणि श्रीजी शिपिंग त्यांचे आयपीओ लाँच करण्याचा विचार करत आहेत.
या सर्व कंपन्यांना बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडून आधीच मंजुरी मिळाली आहे. या कंपन्या विस्तार योजना, कर्जाची परतफेड आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी भांडवली खर्चाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निधी गोळा करत आहेत. गेल्या महिन्यात लक्झरी हॉटेल साखळी द लीलाचे मालक यांच्या स्क्लॉस बंगळुरूसह सहा आयपीओ लाँच झाल्यानंतर आता आणखी कंपन्या भांडवली बाजारातून निधी उभारण्यासाठी आयपीओ आणण्यास सज्ज झाल्या आहेत. तथापि, २०२५ मध्ये एकूण आयपीओ येण्याचे प्रमाण मंदावले होते. आतापर्यंत फक्त १६ कंपन्या सार्वजनिक इश्यू घेऊन आल्या आहेत, गेल्या वर्षी याच कालावधीत २९ आयपीओ आले होते. जागतिक आणि देशांतर्गत घटकांच्या मिश्रणामुळे शेअर बाजारामध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे हे प्रमाण मंदावले आहे.
२०२४ मध्ये ९१ पहिल्या सार्वजनिक इश्यूंनी एकत्रितपणे १.६ लाख कोटी रुपये उभारले कारण मजबूत किरकोळ सहभाग, लवचिक अर्थव्यवस्था आणि वाढत्या खासगी भांडवली खर्चामुळे शक्य झाले. एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये २,५०० कोटींचे नवे इक्विटी शेअर्स आतापर्यंत, ६५ कंपन्यांना सेबीकडून अंतिम निरीक्षणे मिळाली आहेत आणि आणखी ६५ अंतिम मंजुरीची वाट पाहत आहेत, जे सार्वजनिक इश्यू लाँच करण्यापूर्वी एक आवश्यक पाऊल आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या प्रस्तावित आयपीओमध्ये २,५०० कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स इश्यू आणि प्रमोटर एचडीएफसी बँकेकडून १०,००० कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे, असे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) च्या मसुद्यानुसार म्हटले आहे. सध्या, एचडीएफसी बँकेकडे नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) मध्ये ९४.३६ टक्के हिस्सा आहे. नवीन इश्यूमधून मिळणारी रक्कम एचडीबीच्या टियर-१ भांडवल आधाराला बळकटी देण्यासाठी वापरली जाईल. त्यामुळे वाढीव कर्ज आणि व्यवसाय वाढ यासारख्या भविष्यातील भांडवली गरजांना पाठिंबा मिळेल. आरबीआयच्या आदेशानुसार, उच्चस्तरीय एनबीएफसी म्हणून वर्गीकृत एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसला सप्टेंबर २०२५ पर्यंत स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध करणे आवश्यक आहे.
एनएसडीएलच्या आयपीओमध्ये ५.०१ कोटी शेअर्सची ऑफर
दरम्यान, एनएसडीएलने त्यांच्या आयपीओमध्ये ५.०१ कोटी शेअर्स ऑफर करण्याची योजना आखली असून सुरुवातीच्या प्रस्तावित ५.७२ कोटी शेअर्सपेक्षा कमी आहे. सेबीने एनएसडीएलला त्यांची लिस्टिंग पूर्ण करण्यासाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
‘या’ प्रमुख कंपन्या आयपीओ आणण्यास सज्ज
एचडीएफसी बँकेची उपकंपनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, कल्पतरू, रुबिकॉन रिसर्च, ऑल टाइम प्लास्टिक्स, रेग्रीन-एक्सेल ईपीसी इंडिया आणि पॅरामेसु बायोटेक यांचा समावेश.
‘या’ कंपन्यांचा आयपीओ लाँच करण्याचा विचार
क्रेडिला, एसके फायनान्स, व्हेरिटास फायनान्स, पारस हेल्थकेअर, सीआयईएल एचआर सर्व्हिसेस, अवान्से फायनान्शियल सर्व्हिसेस, ड्रॉफ-केटल केमिकल्स इंडिया, ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्स आणि श्रीजी शिपिंग.