प्रत्येक कारमध्ये असतं 'हे' बटन, पण ९९ टक्के लोकांना नाही माहित योग्य वापर

उन्हाळ्यात एसीची कुलिंग कमी होत आहे. नव्या कारचे एसीही या गरमीत प्रभावीपणे काम करताना दिसत नाहीत. यामागचं कारण नेमकं काय?
एअर रिसर्क्युलेशन बटन
एअर रिसर्क्युलेशन बटनप्रातिनिधिक फोटो

दरवर्षीप्रमाणं यंदाच्या उन्हाळ्यातही लोक गरमीनं त्रस्त झाले आहेत. घराबाहेर सोडाच, पण घरामध्ये बसणंही कठीण होऊन बसलंय. जास्त गरमीमुळं प्रवास करणं कठीण होतंय. खासकरून एसीची कुलिंग कमी होत आहे. नव्या कारचे एसीही या गरमीत प्रभावीपणे काम करताना दिसत नाहीत. यामागचं कारण नेमकं काय? बऱ्याचदा आपल्या काही चुकांमुळंही एसी नीट काम करत नाही किंवा कार थंड व्हायला जास्त वेळ लागतो. प्रत्येक कारमध्ये एक एअर रिसर्क्युलेशन बटन (Air Recirculation) असतं. त्याचा योग्य वापर कसा करायचा हे लोकांना माहीतच नाही. या बटनाचा योग्य वापर करणं आपण शिकलो, तर उन्हाळ्यात कार वेगानं थंड होईल आणि एसीची कुलिंगसुद्धा वाढेल. कित्येक कारमध्ये हे बटन मॅन्युअल आणि काही कारमध्ये ऑटोमॅटिक असतं. आज आपण एअर रिसर्क्युलेशन बटनाचा योग्य वापर कसा करायचा, हे जाणून घेणार आहोत.

एअर रिसर्क्युलेशन बटनाचा योग्य वापर-

कारमध्ये एसी बटनाच्या जवळ एक एअर रिसर्क्युलेशन बटन असतं. त्यावर एक यु-टर्न सारखा लोगो बनलेला असतो. जेव्हा बटन ऑन असतं, तेव्हा कारमध्ये थंड हवेचं रिसर्क्युलेशन होतं. म्हणजेच बाहेरच्या हवेला कारमध्ये येण्यापासून रोखलं जातं. त्यामुळं कार जलद गतीनं थंड होऊ लागते. या फीचरचा वापर गरमीमध्ये केला जातो, जेव्हा कारच्या बाहेरची हवा जास्त गरम असते.

गरमीच्या दिवसात कारचा एसी बाहेरच्या गरम हवेला खेचून थंड करत असतो. अशा परिस्थितीत एअर कंडिशनिंगपासून आपल्या केबिनला थंड व्हायला खूप जास्त वेळ लागतो. अशावेळी तुम्ही एअर रिसर्क्युलेश फीचरचा वापर करू शकता. त्याच्या वापरानं केबिन काही मिनिटांत थंड होईल. जर रिसर्क्युलेशन ऑन केलं असेल, तर कारचा एसी केबिनला थंड करण्यासाठी बाहेरच्या गरम हवेचा वापर करत नाही, तर त्याऐवजी आतील थंड हवेचाच वापर केला जातो.

केबिनची हवा थंड झाल्यानंतर एअर रिसर्क्युलेशन ऑन करता येतं. त्यामुळं केबिन वेगानं थंड होऊ लागते. गरमीच्या दिवसात याचा वापर करायला हवा. जेव्हा जास्त कडक ऊन असतं आणि तुमची कार ऊन्हात उभी असते, तेव्हा कारची केबिन खूपच गरम होते. कारची सीटसुद्धा प्रचंड तापते. अशावेळी एसी वापरण्यापूर्वी कारचा ब्लोअर चालवला हवा. सोबतच कारचे सर्व दरवाजे उघडायला हवेत. असं केल्यानं कारमध्ये असलेली गरम हवा बाहेर निघून जाते.

logo
marathi.freepressjournal.in