Gold Price on 10 May 2024: अक्षय्य तृतीयेचा सण आज १० मे रोजी शुक्रवारी साजरा केला जात आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी केली जाते. कारण या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. सराफा व्यापारी संधीचा फायदा घेतात. या दिवशी सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडू लागतात. सराफा बाजाराची काय स्थिती आहे ते जाणून घेऊया.
आज भारतात सोन्याचा भाव २२ कॅरेट सोन्यासाठी ६,६१४ प्रति ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्यासाठी ७,२१५ प्रति ग्रॅम आहे. कोणत्या शहरात किती भाव आहे हे जाणून घेऊयात.
मुंबईत आज सोन्याचा भाव
मुंबईत २२ कॅरेट सोन्यासाठी सोन्याची किंमत ६,६१४ रुपये प्रति ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,२१५ रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाण्यात आज सोन्याचा भाव
मुंबई प्रमाणेच आज ठाण्यात २२ कॅरेट सोन्यासाठी ६,६१४ रुपये प्रति ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्यासाठी ७,२१५ रुपये प्रति ग्रॅम भाव आहे.
पुण्यात आज सोन्याचा भाव
पुण्यात आज २२ कॅरेट सोन्यासाठी सोन्याची किंमत ६,६१४ रुपये प्रति ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,२१५ रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपुरात आज सोन्याचा भाव
नागपुरात आज २२ कॅरेट सोन्यासाठी ६,६१४ रुपये प्रति ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्यासाठी ७,२१५ रुपये प्रति ग्रॅम भाव आहे.
दिल्लीत आज सोन्याचा भाव
दिल्लीत आज सोन्याचा भाव २२ कॅरेट सोन्यासाठी ६६२९ रुपये प्रति ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्यासाठी ७२३० रुपये प्रति ग्रॅम आहे.
अहमदाबादमध्ये आज सोन्याचा भाव
अहमदाबादमध्ये आज सोन्याचा भाव २२ कॅरेट सोन्यासाठी ६६१९ रुपये प्रति ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्यासाठी ७२२० रुपये प्रति ग्रॅम आहे.
बेंगळुरूमध्ये आज सोन्याचा भाव
बेंगळुरूमध्ये आज सोन्याचा भाव २२ कॅरेट सोन्यासाठी ६६१४ रुपये प्रति ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्यासाठी ७२१५ रुपये प्रति ग्रॅम आहे.
सुरतमध्ये आज सोन्याचा भाव
सुरतमध्ये आज सोन्याचा भाव २२ कॅरेट सोन्यासाठी ६६१९ प्रति ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्यासाठी ७२२० रुपये प्रति ग्रॅम आहे.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेले सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)