व्हॉट्स-ॲप आधारित नागरी सेवा; महाराष्ट्राचे मेटासोबत सहकार्य

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि सरकारी कार्यक्षमता सुधारासाठी महाराष्ट्र सरकारने मेटासोबत सहयोग केला आहे.
व्हॉट्स-ॲप आधारित नागरी सेवा; महाराष्ट्राचे मेटासोबत सहकार्य
एक्स @Dev_Fadnavis
Published on

मुंबई : नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि सरकारी कार्यक्षमता सुधारासाठी महाराष्ट्र सरकारने मेटासोबत सहयोग केला आहे.

मुंबई टेक वीक २०२५ दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या या सहयोगाचा व्हॉट्सअॅपद्वारे एकाच मोबाइल क्रमांकावर सर्व नागरिक सेवा प्रदान करण्या चा मनसुबा आहे, ज्यामुळे १२५ दशलक्ष नागरिकांना कुठूनही, कधीही सरकारी सेवांचा लाभ घेता येईल. चॅटबॉट ‘आपले सरकार’ मराठी, इंग्रजी व हिंदी या तीन भाषांमध्ये उपलब्ध असेल आणि टेक्ट्द् व वॉईसच्याम माध्यइमातून सेवा देईल. या चॅटबॉटमध्ये तक्रारींचे निराकरण करणे, महत्त्वाची कागदपत्रे व प्रमाणपत्रे डाउनलोड करणे, एमएसआरटीसी किंवा बेस्टद्वारे बस तिकिटे बुक करणे आणि महाराष्ट्राततील शेतकरी व नागरिकांना वेळेवर माहिती देणे यांसारख्या विविध सेवा उपलब्ध असतील.

सरकारमधील कार्यक्षमता व उत्पादकता वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकार मेटाच्या ओपन सोर्स लार्ज लँग्वेज मॉडेल ‘लामा'चा वापर करेल. या सहयोगाचा भाग म्ह्णून मेटा जेन एआय सोल्यूशन विकसित करण्यादसोबत अंमलात आणण्यासाठी पायलट प्रकल्प हाती घेईल, ज्या्मुळे सरकारी कागदपत्रे सहजपणे उपलब्धा होतील आणि निर्णय घेण्याघस गती मिळेल.

logo
marathi.freepressjournal.in