रतन टाटा यांची 15 हजार कोटी रुपयांची संपत्ती कोणाला मिळणार? RTEF ची जबाबदारी कोणाकडे असणार?

आपली वैयक्तिक संपत्ती समाजसेवेसाठी वापरण्यात यावी, अशी रतन टाटा यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी 'रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन'ची (RTEF) स्थापना केली होती. या संस्थेचा खर्च त्यांच्या वैयक्तिक संपत्तीतून चालवला जातो. मात्र, टाटा यांच्या मृत्यूपत्रात RTEF चे विश्वस्त कोण निवडणार यासंदर्भात स्पष्टपणे नमूद करण्यात आले नव्हते. त्यामुळे RTEF संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.
रतन टाटा यांची वैयक्तिक 15 हजार कोटी रुपयांची संपत्ती कोणाला मिळणार? कोण असेल उत्तराधिकारी?
रतन टाटा यांची वैयक्तिक 15 हजार कोटी रुपयांची संपत्ती कोणाला मिळणार? कोण असेल उत्तराधिकारी?X- Harsh Goenka
Published on

उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर त्यांची 15 हजार कोटी रुपयांची संपत्ती नेमकी कोणाला मिळणार याची सध्या चर्चा सुरू आहे. आपली वैयक्तिक संपत्ती समाजसेवेसाठी वापरण्यात यावी, अशी त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनची (RTEF) ची स्थापना केली होती. या संस्थेचा खर्च त्यांच्या वैयक्तिक संपत्तीतून चालवला जातो. मात्र, टाटा यांच्या मृत्यूपत्रात RTEF चे विश्वस्त कोण निवडणार यासंदर्भात स्पष्टपणे नमूद करण्यात आले नव्हते. त्यामुळे RTEF संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.

रतन टाटा यांचा 9 ऑक्टोबर 2024 ला मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर नोएल टाटा यांनी टाटा समूहाची धुरा सांभाळली आहे. रतन टाटा यांनी 2022 मध्ये रतन टाटा एंडोन्मेंट ट्रस्ट आणि रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनची (RTEF) अशा दोन संस्था स्थापन केल्या होत्या. याचा खर्च त्यांच्या वैयक्तिक संपत्तीतून करण्यात येत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या 15 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे नियोजन मुख्यत्वेकरून याच RTEF च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. रतन टाटा यांनी त्यावेळी आर. आर. शास्त्री आणि बुर्जिस तारापोरवाला यांना RTEF चे होल्डिंग ट्रस्टी म्हणून नेमले होते. तसेच रतन टाटा यांच्या मृत्यूसमयी त्यांच्याजवळ असलेल्या फरारी आणि अन्य अनेक गाड्यांचा लिलाव केला जाऊ शकतो. याचे पैसे देखील RTEF मध्ये जमा करण्याची शक्यता आहे. मात्र, RTEF च्या विश्वस्तांची निवड कोण करणार याबाबत टाटा यांच्या मृत्यूपत्रात स्पष्टता नाही. त्यामुळे याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त सरन्यायाधीशांची मदत घेतली जाऊ शकते

RTEF चे विश्वस्त निवडण्याचा अधिकार कोणाला मिळायला हवा यासाठी टाटा कुटुंबीय तसेच टाटा ट्रस्टच्या सदस्यांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त सरन्यायाधीशांची मध्यस्थ (arbitrator) म्हणून मदत घेतली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.

सर्व सामान्यपणे जर मृत्यूपत्रात एखादी बाब स्पष्टपणे नमूद केलेली नसेल तर त्या संपत्तीच्या एक्झिक्यूटर्सनी मयत व्यक्तीच्या इच्छेनुसार पुढील व्यवस्थापन करावे, असा एक संकेत आहे. रतन टाटा यांनी आपल्या मृत्यूपत्रात डेरियस खंबाटा, मेहली मिस्त्री, शिरीन आणि डायना जेजीभॉय यांना एक्झिक्युटिव्ह म्हणून निवडले होते. रतन टाटा यांना RTEF ही कंपनी टाटा ट्रस्ट पासून वेगळी ठेवण्याची इच्छा होती. टाटा कुटुंबीय तसेच टाटा ट्रस्टच्या सदस्यांकडून विश्वस्त निवडीसाठी जर मध्यस्थ नेमण्यात आले तर ते त्यांना रतन टाटा यांच्या अंतिम इच्छेनुसार पुढील कार्यवाही करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

logo
marathi.freepressjournal.in