घाऊक महागाईचा दिलासा; RBI कडून फेब्रुवारीमध्ये पाव टक्का व्याजदर कपातीची शक्यता

अन्नधान्य स्वस्त झाल्यामुळे घाऊक किंमत आधारित महागाई दर नोव्हेंबरमध्ये ३ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर १.८९ टक्क्यांवर घसरली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : अन्नधान्य स्वस्त झाल्यामुळे घाऊक किंमत आधारित महागाई दर नोव्हेंबरमध्ये ३ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर १.८९ टक्क्यांवर घसरली आहे. घाऊक महागाईच्या दिलासा मिळाल्यामुळे तज्ज्ञांनी फेब्रुवारीमध्ये द्वैमासिक पतधोरण आढाव्यात आरबीआय ०.२५ टक्के व्याजदर कपातीचा अंदाज वर्तवला आहे.

घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) आधारित घाऊक महागाई ऑक्टोबर २०२४ मध्ये २.३६ टक्के होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ती ०.३९ टक्के होती. ऑगस्ट २०२४ मध्ये हा दर १.२५ टक्के होता.

इंधन आणि उर्जा श्रेणीत नोव्हेंबरमध्ये ५.८३ टक्क्यांची घसरण झाली, तर ऑक्टोबरमध्ये ५.७९ टक्क्यांची घसरण झाली. उत्पादित वस्तूंमध्ये नोव्हेंबरमध्ये २ टक्के महागाई दर राहिला तर ऑक्टोबरमध्ये हा दर १.५० टक्के होता.

एका संशोधन नोटमध्ये, बार्कलेजने सांगितले की, नोव्हेंबरमध्ये घाऊक किमतीची महागाई कमी झाली. त्यांचे प्राथमिक कारण अन्नधान्य महागाई कमी झाली, जी उत्पादित उत्पादनांमध्ये दिसणाऱ्या उच्च चलनवाढीच्या भरपाईपेक्षा अधिक आहे. डिसेंबरमध्ये आत्तापर्यंत जागतिक पातळीवर किमती ०.७ टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि डिसेंबरचा घाऊ महागाई दर वाढण्याची शक्यता आहे, असे बार्कलेज म्हणाले.

गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, किरकोळ महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये ६.२ टक्क्यांच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये घसरुन ५.५ टक्क्यांवर आला.

घाऊक महागाई घसरण हे पतधोरण समितीच्या (एमपिसि) २-६ टक्क्यांच्या दिलासादायक पातळीमध्ये आहे. किरकोळ महागाई दर मार्च २०२५ पर्यंत ४ टक्क्यांच्या लक्ष्याच्या जवळ जाईल. त्यामुळे आम्ही एमपीसीने आपल्या फेब्रुवारीच्या बैठकीत पॉलिसी रेपो दरात पाव टक्का कपात करण्याची अपेक्षा केली आहे. नव्या गव्हर्नरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आगामी एमपीसीच्या बैठकीत पाव टक्का निर्णयाची जबाबदारी घेईल, असे बार्कलेज म्हणाले.

सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला आरबीआयच्या नवीन गव्हर्नरची नियुक्ती केली. माजी महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी ११ डिसेंबर रोजी शक्तीकांत दास यांच्या जागी २६ वे आरबीआय गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. ऑक्टोबरमध्ये सरकारने सहा सदस्यीय एमपीसीची पुनर्रचना केली होती.

इक्रा लि.चे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ राहुल अग्रवाल यांनी सांगितले की, घाऊक महागाई दर वाढला होता, तो मुख्यत: प्राथमिक खाद्यपदार्थांमुळे होता, जो मागील महिन्यातील १३.५ टक्क्यांवरून ८.६ टक्क्यांच्या तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. अनुकूल आधार असूनही डिसेंबर २०२४ मध्ये घाऊक महागाई दर २.५-३ टक्क्यांपर्यंत (डिसेंबर २०२३ मध्ये +०.९ टक्के) वाढेल, अशी इक्राला अपेक्षा आहे.

जागतिक कमोडिटी, कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

ग्राहक व्यवहार विभागाद्वारे जारी केल्या जाणाऱ्या आकडेवारीत बहुसंख्य अन्नपदार्थांच्या वार्षिक आधारावर महागाई दर डिसेंबर २०२४ मध्ये (१५डिसेंबर २०२४ पर्यंत) आधीच्या नोव्हेंबर २०२४ च्या तुलनेत वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त, जागतिक कमोडिटी आणि कच्च्या तेलाच्या किमतींमधली वार्षिक आधारावर महागाई देखील या महिन्यांमध्ये कमी झाली आहे, तर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपयाच्या होणाऱ्या घसरणीमुळे आयातीच्या खर्चावर काही प्रमाणात दबाव वाढतो. चालू महिन्याच्या पलीकडे पाहता, बाजारात खरीप पिकांची आवक, आणि उत्तम पेरणीचा ट्रेंड आणि वाढलेल्या जलसाठ्यांची पातळी यांच्यामध्ये रब्बी पिकासाठी मजबूत दृष्टीकोन हा अन्न महागाई कमी होण्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे, असे अग्रवाल म्हणाले.

अन्नधान्य महागाई घसरून ८.६३ टक्क्यांवर

आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये अन्नधान्यांची महागाई ८.६३ टक्क्यांवर घसरली, जी ऑक्टोबरमध्ये १३.५४ टक्के होती. भाजीपाल्याच्या महागाईत घसरण होऊन २८.५७ टक्क्यांवर आली, जी ऑक्टोबरमधील ६३.०४ टक्के होती. बटाट्याची महागाई मात्र ८२.७९ टक्क्यांवर कायम राहिली, तर कांद्याच्या भावात नोव्हेंबरमध्ये २.८५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

logo
marathi.freepressjournal.in