भारतीय शेअर बाजारात महिलांचा हिस्सा वाढतोय; चार नवीन गुंतवणूकदारांमागे जवळपास १ गुंतवणूकदार महिला

देशांतर्गत शेअर बाजारात महिलांचा सहभाग वाढला आहे आणि प्रत्येक चार नवीन गुंतवणूकदारांमागे जवळपास १ गुंतवणूकदार महिला खाते आहेत, असे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटले आहे.
भारतीय शेअर बाजारात महिलांचा हिस्सा वाढतोय; चार नवीन गुंतवणूकदारांमागे जवळपास १ गुंतवणूकदार महिला
Published on

देशांतर्गत शेअर बाजारात महिलांचा सहभाग वाढला आहे आणि प्रत्येक चार नवीन गुंतवणूकदारांमागे जवळपास १ गुंतवणूकदार महिला खाते आहेत, असे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटले आहे. बाजारातील सहभाग वाढत असल्याने २०२१ पासून दरवर्षी सुमारे ३० दशलक्ष नवीन डीमॅट खाती जोडली जात आहेत. अहवालात म्हटले आहे की, २०२१ पासून दरवर्षी सरासरी अंदाजे ३० दशलक्ष नवीन डिमॅट खाती जोडली जात आहेत. आता जवळपास प्रत्येक ४ पैकी १ महिला गुंतवणूकदार आहे. संपूर्ण भारतातील शेअर बाजारातील महिलांच्या सहभागामध्ये सातत्याने वाढ होत असून आतापर्यंत दिल्ली (२९.८ टक्के) आघाडीवर आहे. त्यानंतर महाराष्ट्र (२७.७ टक्के) आणि तामिळनाडूचा (२७.५ टक्के) क्रमांक लागतो. याउलट, बिहार (१५.४ टक्के), उत्तर प्रदेश (१८.२ टक्के), आणि ओदिशा (१९.४ टक्के) यांसारख्या राज्यांमध्ये महिला सहभागाची पातळी २० टक्क्यांपेक्षा कमी आहे, जी लिंग समावेशात प्रादेशिक असमानता दर्शवते. हे आकडे २३.९ टक्क्यांच्या राष्ट्रीय सरासरीला लक्षणीयरीत्या मागे टाकतात.

logo
marathi.freepressjournal.in