जगातील पहिली CNG बाईक उद्या होणार लॉन्च, बजाजने शेअर केला खास टीझर

बजाज ऑटो 5 जुलै 2024 रोजी जगातील पहिली CNG बाईक लॉन्च करण्यासाठी करणार आहे.
जगातील पहिली CNG बाईक उद्या होणार लॉन्च, बजाजने शेअर केला खास टीझर

मुंबई: बजाज ऑटो जगातील पहिली CNG बाईक घेऊन येत आहे. कंपनी उद्या म्हणजेच 5 जुलै 2024 रोजी जगातील पहिली CNG बाईक लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. या खास बाईकच्या लॉन्चवेळी भारत सरकारचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. ही बाईक अधिकृत लॉन्च होण्यापूर्वीचं बजाजनं आपल्या खास CNG बाईकचा टीझर प्रसिद्ध केला आहे.

जगातील पहिली CNC बाईक:

या छोट्या टीझरमध्ये तुम्हाला बजाज सीएनजी बाइकची झलक पाहायला मिळेल. या टीझरमध्ये दिसणारी सर्वात खास गोष्ट म्हणजे CNG आणि पेट्रोलमध्ये बदल करण्यासाठी दिलेला स्विच. ते पाहता हे बटण डाव्या बाजूला हँडलवर असेल, हे स्पष्ट झालंय.

बजाजची ही बाईक जगातील पहिली CNG बाईक असेल. त्यामुळे, कंपनीला ती अधिकाधिक लोकांना आवडेल अशा पद्धतीनं बनवली आहे. या बाईकचा सध्याचा टीझर आणि पूर्वीचे स्पाय शॉट्स हे दर्शवितात की ती केवळ मजबूत इंजिनसह येणार नाही तर आकर्षक लुक देखील असेल. ही बाईक 125cc इंजिन असलेली प्रीमियम मोटरसायकल असून ती एडव्हेंचर (ADV) बाईकसारखीही असेल. जेणेकरुन ती नॉर्मल युजरसोबतच एडव्हेंचर बाईकप्रेमींनाही आवडेल.

Bajaj CNC Bike फीचर्स:

बजाजची नवीन सीएनजी बाईक इतर 125 सीसी मोटारसायकलींशी स्पर्धा करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यात ADV-बेस्ड डिझाइन आहे, जी ग्राहकांना आकर्षित करेल.

स्पाय फोटोंवरून असे दिसून आले आहे की, तिच्यात सुमारे5 लिटर पेट्रोल ठेवण्याची क्षमता असलेली एक लहान इंधन टाकी देण्यात आली आहे आणि बाईकच्या व्हीलबेसमध्ये एक लांब सीट आहे, तिच्या खाली CNG टाकी आहे. दोन्ही इंधनांची एकत्रित क्षमता पारंपारिक 125cc कम्युटर बाईकसारखीच रेंज देईल.

बजाज सीएनजी बाईकमध्ये सिल्व्हरमध्ये हायलाइट केलेले मस्क्युलर टँक कव्हर्स देखील आहेत, जे हेडलाइट हाउसिंगपर्यंत विस्तारलेले आहेत. एक गोल हेडलाईट, एक रेट्रो टच कनेक्ट आहे. तर हँडलबार ब्रेसेस, नकल गार्ड आणि फ्रंट डिस्क ब्रेक प्रवाशांच्या सेगमेंटला प्रीमियम फील देतात.

बजाज सीएनजी 125 सीसी इंजिन असण्याची अपेक्षा आहे. तथापि, पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीच्या कमी कार्यक्षमतेमुळे ती 100cc इंजिनशी मिळताजुळता परफॉर्मन्स देऊ शकतं. ही सीएनजी बाईक उत्कृष्ट मायलेज आणि परवडणारी असेल.

logo
marathi.freepressjournal.in