तरुण गुंतवणूकदारांचा कल शेअर बाजाराकडेच; म्युच्युअल फंडऐवजी थेट गुंतवणूक करण्यास प्रौढांचे प्राधान्य

फिन वन, एंजेल वन लिमिटेडच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात, ५८ टक्के तरुण भारतीय गुंतवणूकदार हे सध्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात. तर ३९ टक्के गुंतवणूकदार हे म्युच्युअल फंडांना पसंती देतात.
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो
Published on

नवी दिल्ली : तरुणांची लक्षणीय टक्केवारी हा म्युच्युअल फंडाचा मार्ग निवडण्याऐवजी थेट इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहे, असे एका अहवालात म्हटले आहे.

फिनटेक ब्रोकरेज फर्म एंजेल वनच्या पुढाकार फिन वनच्या अहवालानुसार, ९३ टक्के तरुण वर्ग हे सातत्यपूर्ण बचत करणारे आहेत. त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या तुलनेत २० ते ३० टक्के बचत करतात.

या व्यतिरिक्त, कंपनी शेअर हे पसंतीचे गुंतवणूक पर्याय म्हणून लक्षणीय ठरले आहेत. अहवालाकरिता ४५ टक्के प्रतिसादकर्त्यांनी मुदत ठेवी किंवा सोने यासारख्या पारंपरिक पर्यायांना पसंती दिली आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

फिन वन, एंजेल वन लिमिटेडच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात, ५८ टक्के तरुण भारतीय गुंतवणूकदार हे सध्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात. तर ३९ टक्के गुंतवणूकदार हे म्युच्युअल फंडांना पसंती देतात.

मुदत ठेवी (२२ टक्के) आणि आवर्ती ठेवी (२६ टक्के) यासारख्या सुरक्षित पर्यायांचा अवलंब तुलनेने कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तरुणांमधील अधिक परतावा आणि स्थिर बचत यांच्यातील संतुलित दृष्टिकोन दर्शवतो, असेही याबाबतच्या अहवालात म्हटले आहे.

याबाबतच्या अहवालात १३ हून अधिक भारतीय शहरांमधील १,६०० तरुण भारतीयांचे मत जाणून घेण्यात आले. यामध्ये बचतीविषयीचा कल, गुंतवणूक प्राधान्य, आर्थिक साक्षरता आणि तंत्रज्ञान आणि आर्थिक साधनांचा वापर या चार प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे.

देशातील तरुण पिढीच्या आर्थिक सवयींवर फिनटेकचा वाढता प्रभाव अधोरेखित करून ६८ टक्के प्रतिसादकर्त्यांनी स्वयंचलित बचत साधने नियमितपणे वापरून डिजिटल प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञानाची भूमिका अधोरेखित केली.

शिस्तबद्ध बचतीच्या सवयी असूनही ८५ टक्के तरुण भारतीयांनी वाढत्या खर्चाचा उल्लेख केला आहे. अन्न, उपयुक्तता आणि वाहतूक आदी खर्च हे बचत करण्यातील सर्वात महत्त्वपूर्ण अडथळा असल्याचे त्यांना वाटत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

वाढत्या राहणीमानाचा खर्च हा तरुणांसाठी एक आव्हान असल्याचे मत सर्वेक्षणातील निष्कर्षातून दिसून येते.

logo
marathi.freepressjournal.in