Zomato ने केला नावात बदल; 'हे' असणार नवीन नाव; कंपनीच्या CEO कडून मोठी अपडेट

ऑनलाइन फूड डिलिवरी प्लॅटफॉर्म कंपनी Zomato ने आपल्या नावात बदल केला आहे. कंपनीचे CEO दीपेंदर गोयल यांनी यांची घोषणा केली आहे. कंपनी बोर्ड मीटिंगमध्ये आज गुरुवारी याला मंजुरी देण्यात आली. एका फाईलिंगच्या माध्यमातून बीएसईला याबाबत सूचना दिली आहे. CEO दीपेंदर गोयल यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये याची माहिती शेअर केली आहे.
Zomato ने केला नावात बदल; 'हे' असणार नवीन नाव; कंपनीच्या CEO कडून मोठी अपडेट
Zomato ने केला नावात बदल; 'हे' असणार नवीन नाव; कंपनीच्या CEO कडून मोठी अपडेट Deepinder Goyal @deepigoyal
Published on

ऑनलाइन फूड डिलिवरी प्लॅटफॉर्म कंपनी Zomato ने आपल्या नावात बदल केला आहे. कंपनीचे CEO दीपेंदर गोयल यांनी यांची घोषणा केली आहे. कंपनी बोर्ड मीटिंगमध्ये आज गुरुवारी याला मंजुरी देण्यात आली. एका फाईलिंगच्या माध्यमातून बीएसईला (Bombay Stock Exchange) याबाबत सूचना दिली आहे. CEO दीपेंदर गोयल यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये याची माहिती शेअर केली आहे.

काय आहे कंपनीचे नवीन नाव?

Zomato ही ऑनलाइन फूड डिलिवरी करणारी एक मोठी कंपनी आहे. या कंपनीने नाव बदलण्याचा निर्णय घेतला असून नवीन नाव 'इटरनल' (Eternal), असे होणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना गोयल यांनी म्हटले आहे की इटरनल हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून ते वापरत आहेत. तसेच नाव बदलण्याचा नाव यापूर्वीच घेण्यात आला होत. आज अधिकृतरित्या याचे नाव इटरनल करण्यात आले आहे.

का बदलले नाव?

याविषयी गोयल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही जेव्हा 'ब्लिंकिट' खरेदी केले तेव्हाच आम्ही हा निर्णय घेतला होता. कंपनी आणि ब्रँड अॅप यामध्ये फरक करण्यासाठी आम्ही हे ठरवले होते. Zomato शिवाय अन्य कोणते प्रोडक्ट आमच्यासाठी महत्वाचे झाले तर आम्ही सार्वजनिक स्वरुपात कंपनीचे नाव इटरनल करू. मला असे वाटते ब्लिंकिटसह आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. इटरनल (Eternal) हे एक शक्तिशाली नाव आहे. कारण 'इटरनल' (Eternal) मध्ये आश्वासन आणि विरोधाभास दोन्ही आहेत. इटरनलमध्ये काम करणे म्हणजे दररोज जागे होणे. हे फक्त नाव बदलणे नाही; ते एक मिशन स्टेटमेंट आहे, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

स्टॉक टिकरमध्येही करणार बदल

गोयल यांनी माहिती दिली की आम्ही आमच्या स्टॉक टिकरमध्ये देखील Zomato वरून 'इटरनल' (Eternal) असा बदल करू. इटरनलमध्ये (Eternal) चार प्रमुख व्यवसाय असतील (सध्या) - Zomato (झोमॅटो), ब्लिंकिट, डिस्ट्रिक्ट आणि हायपरप्युअर, असे गोयल यांनी म्हटले आहे.

ॲपच्या नावात मात्र होणार नाही बदल

Zomato ने कंपनीचे नाव बदलून इटरनल (Eternal) असे केले असले तरी हे नाव स्टॉक टिकरमध्ये बदलले जाईल. मात्र, त्याचवेळी Zomato च्या ॲपच्या नावात मात्र बदल होणार नाहीत, अशी माहिती मनी कंट्रोलने दिली आहे. त्यामुळे ऑनलाइन फूड मागवणाऱ्या ग्राहकांना नवीन नावाने ॲप डाऊनलोडची गरज पडणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in