अभिनेता रणबीर कपूरचं होतंय कौतुक, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अभिनेता रणबीर कपूरचं होतंय कौतुक, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामूळे नेहमी चर्चेत असतो. आता तो एका नव्या कारणाचे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण रणबीरचं कौतुक करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर हा फिल्मफेअर अवॉर्ड्ससाठी जाताना कलिना विमानतळावर दिसला. यावेळी पापाराझींनी त्याला अडवलं, दरम्यान रणबीर पापाराझींसमोर पोज देताना दिसत आहे. यावेळी एक सिक्युरिटी गार्ड पापाराझीच्या कॅमेऱ्यासमोर येतो. सर्व पापाराझी त्या सिक्युरिटीला ओरडू लागतात. काही फोटोग्राफर्स हे सिक्युरिटी गार्डला कॅमेऱ्याच्या समोरून जाण्यास सांगतात. हे रणबीरच्या लक्षात येताच रणबीर सिक्युरिटी गार्डला त्याच्या जवळ बोलतो आणि त्याच्यासोबत फोटोसाठी पोज देतो. यादरम्यान रणबीर सोबत फोटो काढताना सिक्युरिटी गार्डच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य दिसते. रणबीरच्या या कृतीचं नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. तसेच या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हायरल झालेल्या रणबीरच्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "रणबीर खूप नम्र आहे!" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "सेलिब्रिटींचा स्वभाव असाच प्रेमळ असावा" असं म्हंटल आहे.

रणबीर कपूर सध्या नितीश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात तो भगवान रामाची भूमिका साकारू शकतो, असे सांगितले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in