ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhle) यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली. विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव, काय आहे कारण ?
"विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत आहेत आणि हात-पाय हलवत आहेत. येत्या ४८ तासांत त्यांचा व्हेंटिलेटरचा व्हेंटिलेटरचा सपोर्ट निघण्याची शक्यता आहे. त्यांचा रक्तदाब आणि मूत्रपिंडाचे कार्य स्थिर आहे," अशी माहिती शिरीष यांनी दिली. याडगीकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
गुरुवारी शिरीष याडगीकर यांनी सांगितले की, विक्रम गोखले यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत. त्यानुसार डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येत असून विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.