"आता इतक्या पैशांमध्ये..."; ‘शोले’च्या तिकीटाचा फोटो शेअर करत बिग बींची खास पोस्ट

हिंदी सिनेमाच्या इतिहासातील ज्या काही चित्रपटांनी कायमस्वरूपी आपली छाप सोडली आहे, त्यात 'शोले'चं नाव हमखास घेतलं जातं. आता जवळपास पन्नास वर्षांनी, बिग बींनी या चित्रपटाशी संबंधित एक खास आठवण शेअर केली आहे.
"आता इतक्या पैशांमध्ये..."; ‘शोले’च्या तिकीटाचा फोटो शेअर करत बिग बींची खास पोस्ट
Tumblr (@srbachchan)
Published on

हिंदी सिनेमाच्या इतिहासातील ज्या काही चित्रपटांनी कायमस्वरूपी आपली छाप सोडली आहे, त्यात 'शोले'चं नाव हमखास घेतलं जातं. १९७५ साली आलेल्या या कल्ट चित्रपटाने अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांना घराघरात पोचवलं. आता जवळपास पन्नास वर्षांनी, बिग बींनी या चित्रपटाशी संबंधित एक खास आठवण शेअर केली आहे.

आज (दि. २८) सकाळी आपल्या वैयक्तिक ब्लॉगवर अमिताभ बच्चन यांनी ‘शोले’च्या जुन्या तिकीटचा फोटो पोस्ट केला. या तिकीटाची किंमत त्याकाळी फक्त २० रुपये होती. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “'शोले'चे हे तिकीट मी जपून ठेवला आहे. त्याची किंमत २० रुपये होती. आजकाल सिनेमागृहात एका ड्रिंकची किंमत एवढीच आहे असं ऐकलंय. हे खरं आहे का?”

Tumblr (@srbachchan)

रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले'मध्ये जय आणि वीरूच्या भूमिकांमध्ये अमिताभ आणि धर्मेंद्र झळकले होते. संजीव कुमार, अमजद खान, हेमा मालिनी आणि जया बच्चन यांचाही महत्त्वाचा सहभाग होता. एक सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि गावात धुमाकूळ घालणाऱ्या डाकूच्या संघर्षाची ही कथा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

वर्कफ्रंट विषयी सांगायचं झालं, तर अमिताभ बच्चन लवकरच 'रामायण' चित्रपटात गुरु वशिष्ठांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या भव्य प्रोजेक्टमध्ये रणबीर कपूर रामाच्या आणि साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत झळकणार असून, ४००० कोटींच्या बजेटमध्ये बनणारी ही फिल्म अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in