आशा भोसले यांचं चकीत करणारं वक्यव्य, म्हणाल्या...

आशा भोसले यांना नेमकं यातून सांगायचं काय होतं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
आशा भोसले यांचं चकीत करणारं वक्यव्य, म्हणाल्या...

आशा भोसले यांचं भारतीय संगीत विश्वात मोठं स्थान आहे. त्यांनी आपलं आयुष्य संगीतसाठी खर्ची घातलं आहे. गेली पाच दशकांहुन अधिक काळ त्या भारतीय संगित रसिकांच्या मनानर राज्य करत आल्या आहेत. आता आशा भोसले या एका नव्या कारणाने चर्चेत आल्या आहेत.

आशा भोसले या सध्या वयाच्या ८९ व्या वर्षात आहेत. मात्र, हा त्यांच्यासाठी फक्त एक आकडा आहे. त्यांचा उत्साह किंचीतही कमी झालेला नाही. त्यांनी नेहमीत सर्वांना मार्गदर्शन केलं आहे. लहान कलाकारांचीही त्या आस्थेने विचारपूस करुन त्यांना समजावून सांगतात. वेगवेगळ्या रियॅलिटी शोमधून देखील आशाजी या सर्वांना मार्गदर्शन करत असतात. आता त्यांचं एक विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

आशा भोसले यांच्या त्यांच्या या विधानमधून नेमकं काय म्हणायचं असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. मी बॉलिवूडमधील एकमेव अशी व्यक्ती आहे की जिला बॉलिवूडचा सर्व इतिहास माहिती आहे. मी जर त्याविषयी सांगायला लागले तर तीन ते चार दिवस अपुर्ण पडतील. मी काहीही विसरलेली नाही. या इंडस्ट्रीमधील मी शेवटची मुघल आहे. असं विधान आशा भोसले यांनी केलं आहे. यामुळे त्यांना नेमकं यातून सांगायचं काय होतं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in