'व्हॉट झुमका' या रिमेकवर आशा भोसलेंची नाराजी, म्हणाल्या....

नुकत्याच प्रदर्शित झालेला 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' या चित्रपटातील 'व्हॉट झुमका' हे गाणं सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंडिगमध्ये आहे
'व्हॉट झुमका' या रिमेकवर आशा भोसलेंची नाराजी, म्हणाल्या....

आज काल बॉलीवूडमध्ये एक वेगळाच ट्रेंड चालू आहे. तो म्हणजे असा की, बॉलीवूडमध्ये सुपरहिट ठरलेल्या गाण्याचं रिमके करून गाणी तयार करायचे. 'टीप टीप बरसा', 'एक दोन तीन', 'हर किसी को' अशी अनेक गाणी रिमेक झाली आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेला 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' या चित्रपटातील 'व्हॉट झुमका' हे गाणं सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंडिगमध्ये आहे. या गाण्याचे अनेक रील्स व्हायरल होत आहे.

तसं बघायला गेलं तर १९९६ साली प्रदर्शित झालेला 'मेरा साया' या चित्रपटातील 'झुमका गिरा रे' हे गाणं आहे आणि त्या गाण्याचा रिमके 'व्हॉट झुमका' असा करण्यात आला आहे. 'झुमका गिरा रे' हे गाणं सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी गायलं आहे. पण 'रॉकी और राणी कि प्रेम कहाणी' या चित्रपटातील 'व्हॉट झुमका' हे गाणं आशा भोसले यांना इतकं आवडलं नाही. त्यांनी या रिमकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

'इंडिया टुडे' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी या विषयावर भाष्य केले आहे. आशा भोसले म्हणाल्या की, "काळ खूप वेगाने बदलत आहे. यापुढे देखील बदलेल तुम्ही हे थांबवू शकत नाही. सध्या संगीतकार नवीन गाणी बनवण्यासाठी सक्षम नाहीत. म्हुणून ते जुन्या गाण्यांचा वापर करत आहेत. आज ही 'झुमका गिरा रे' हे गाणं चालत आहे आणि ते मला नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात दिसलं. खूप जुनं गाणं आहे". असं आशा भोसले म्हणाल्या.

'रॉकी और राणी कि प्रेम कहाणी' या चित्रपटातील 'व्हॉट झुमका' या गाण्यात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट हे आहेत. तर अर्जित सिंह आणि प्रितम चक्रवर्ती यांनी हे गाणं गायलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in