"आशा@90 वो फिर नहीं आते" : आशा भोसले यांचा जिओ वर्ड गार्डन मुंबई येथे होणार सर्वात मोठा कॉन्सर्ट

गेली आठ दशके भारतीय संगीत जगतावर राज्य करणाऱ्या जगप्रसिद्ध गायिका आशा भोसले आपल्या नव्वदीत सुद्धा गाण्यासाठी सज्ज आहेत.
"आशा@90 वो फिर नहीं आते" : आशा भोसले यांचा जिओ वर्ड गार्डन मुंबई येथे होणार सर्वात मोठा कॉन्सर्ट

मुंबई : गेली आठ दशके भारतीय संगीत जगतावर राज्य करणाऱ्या जगप्रसिद्ध गायिका आशा भोसले आपल्या नव्वदीत सुद्धा गाण्यासाठी सज्ज आहेत. भारतातील सर्वात मोठा कॉन्सर्ट म्हणून ज्या कार्यक्रमाची चर्चा आहे तो कार्यक्रम अर्थातच "आशा@90 वो फिर नहीं आतें" शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी जिओ वर्ल्ड गार्डन बीकेसी मुंबई येथे संध्याकाळी सात वाजता संगीतप्रेमींना याच देही याच डोळा अनुभवता येईल. या कार्यक्रमाचे आयोजन मोरया एंटरटेनमेंटच्या माध्यमातून विशाल गारगोटे यांनी केले आहे.

याच भव्य दिव्य कार्यक्रमाविषयी माहिती देण्याकरिता जुहू येथील जेडब्ल्यू मॅरियट, जुहू येथे आशा भोसले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी आशाजी यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा जुन्या आठवणींना सुद्धा उजाळा देण्यात आला. पत्रकारांच्या आग्रहास्तव आशाजींनी 'केव्हा तरी पहाटे' हे गीत गायले तेव्हा त्यांच्या या गायनाला सर्वांनीच दाद दिली.

आशाताई यांनी यावेळी सांगितले की, "9 मार्च 2024 रोजी होणारा जिओ वर्ल्ड गार्डन येथील हा कार्यक्रम आतापर्यंतचा मुंबईतील सर्वात मोठा कॉन्सर्ट असेल विशेष म्हणजे या कार्यक्रमातून येणारा उत्पन्नाचा हिस्सा हा चाइल्ड डेव्हलपमेंट फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरीब व अनाथ मुलांकरिता दिला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा कार्यक्रम अनुभवावा भविष्यात असा कार्यक्रम तुम्हाला अनुभवता येईलच हे आता कोणी सांगू शकत नाही."

"आशा@90 वो फिर नहीं आतें" या कार्यक्रमात प्रेक्षकांना अनपेक्षित गोष्टी अनुभवता येणार आहे. यामुळे हा कार्यक्रम एक आगळावेगळा ठरणार हे निश्चित असे आयोजकांनी सांगितले. जनाई भोसले यांचे विशेष नृत्य सादरीकरण तसेच भव्य दिव्य असा स्टेज प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असेल. या कार्यक्रमाची तिकीटे बुक माय शो, पेटीएम इन साइडर व फोन बुकिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळू शकतात.

यापूर्वी मोरया एंटरटेनमेंटच्या माध्यमातून गेली दहा वर्ष प्रेक्षकांना दर्जेदार कार्यक्रमाची पर्वणी अनुभवयास मिळालेली आहे. यामध्ये आशा भोसले यांचे मुंबई पुण्यातील कार्यक्रम, मुंबई, पुणे , इंदोर या ठिकाणी सोनू निगम लाईव्ह, श्रेया घोषाल लाईव्ह, कैलास खेर लाईव्ह, सुप्रसिद्ध गायिका के एस चित्रा लाईव्ह, हरिहरन लाईव्ह कॉन्सर्ट व इतर कार्यक्रमाचा उल्लेख करता येईल. मनोरंजन क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट फाउंडेशन व चॅरिटेबल ट्रस्ट गेली कित्येक वर्ष समाज कार्य करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in