लाफ्टर क्वीन भारती सिंहच्या लेकाचं बारसं; सोशल मीडियावर सांगितलं नाव, Photoही केला शेअर

या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आई-बाबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. आता त्यांनी आपल्या लाडक्या लेकाचं नाव जाहीर केलं आहे.
लाफ्टर क्वीन भारती सिंहच्या लेकाचं बारसं; सोशल मीडियावर सांगितलं नाव, Photoही केला शेअर
Published on

लोकप्रिय लाफ्टर क्वीन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया हे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. भारतीने १९ डिसेंबर २०२५ रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आई-बाबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. आता त्यांनी आपल्या लाडक्या लेकाचं नाव जाहीर केलं आहे.

भारती-हर्षने मुलाच्या जन्मानंतर महिनाभराने लाडक्या बाळाचं बारसं केलं असून आपल्या लेकाचं नाव ‘यशवीर’ ठेवलं आहे. ‘यशवीर’ या नावाचा अर्थ यशस्वी आणि शूर असा होतो.

बारश्याच्या निमित्ताने भारती आणि हर्षने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये भारतीने आपल्या हातात यशवीरला घेतलं असून, बाळाच्या चेहऱ्यावर बेबी इमोजी दिला आहे. तसेच, या फोटोला भारतीने ‘Yashveer’ अशी कॅप्शन आणि हर्ट इमोजी दिला आहे.

तर दुसऱ्या फोटोमध्ये भारती-हर्ष, त्यांचा मोठा मुलगा गोला म्हणजेच लक्ष्य आणि लाडका यशवीर असं चौघांचं कुटुंब एकत्र पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये संपूर्ण कुटुंब आनंदी असल्याचं पाहायला मिळतंय.

बारश्याच्या फोटोंमध्ये लिंबाचिया कुटुंब पारंपरिक वेशभूषेत असून भारतीने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे, तर हर्ष आणि त्यांचा मोठा मुलगा लक्ष्यने जांभळ्या रंगाचे मॅचिंग कुर्ते घातले आहेत.

भारतीने याआधी अनेक व्लॉग्समध्ये आपल्या येणाऱ्या बाळाला लाडानं ‘काजू’ असं म्हटलं होतं. आता त्या गोंडस बाळाला ‘यशवीर’ हे अर्थपूर्ण नाव मिळालं आहे. भारती-हर्षने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in