मी अभिमानानं बाहेर पडलो...Bigg Boss 19 फिनालेनंतर प्रणित मोरेची प्रतिक्रिया; म्हणाला - "गौरव जिंकला म्हणजे...

चाहत्यांचा अपार पाठिंबा मिळूनही प्रणित ट्रॉफीपासून थोडक्यात दूर राहिला. ‘द फ्री प्रेस जर्नल’शी बोलताना प्रणितनं आपल्या प्रवासाबद्दल, गौरव खन्नाच्या विजयावर आणि चाहत्यांच्या मिश्र प्रतिक्रियांवर मनमोकळेपणानं भाष्य केलं.
Bigg Boss 19 फिनालेनंतर प्रणित मोरेची प्रतिक्रिया
Bigg Boss 19 फिनालेनंतर प्रणित मोरेची प्रतिक्रिया
Published on

'बिग बॉस १९'च्या संपूर्ण सीझनमध्ये आपल्या खट्याळ स्वभावानं, टायमिंगने दिलेल्या पंचेसनं आणि स्ट्रेटफॉरवर्ड खेळामुळे चर्चेत राहिलेला मराठमोळा स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे अखेर टॉप ३ पर्यंत पोहोचला. चाहत्यांचा अपार पाठिंबा मिळूनही तो ट्रॉफीपासून थोडक्यात दूर राहिला. ‘द फ्री प्रेस जर्नल’शी बोलताना प्रणितनं आपल्या प्रवासाबद्दल, गौरव खन्नाच्या विजयावर आणि चाहत्यांच्या मिश्र प्रतिक्रियांवर मनमोकळेपणानं भाष्य केलं.

“मी अभिमानानं बाहेर पडलो” - प्रणित मोरे

आपल्या बिग बॉस प्रवासाबद्दल प्रणित म्हणतो, "जेव्हा मी हा शो साईन केला, तेव्हा इतका पुढचा प्रवास होईल, असं कधीच वाटलं नव्हतं. लोकांकडून इतका सपोर्ट मिळेल, हे तर स्वप्नातही नव्हतं. त्यामुळे मी स्वतःवर खूप खुश आहे. मी अभिमानानं बाहेर पडलो." टॉप ५मध्ये पोहोचताच जिंकण्याची आशा निर्माण झाली होती, हेही त्यानं सांगितलं.

"टॉप ५मध्ये आलो तेव्हा वाटलं- आता तर मजा येईल, जिंकायलाच हवं! पण माझा आणि गौरवचा एक प्लॅन असायचा… आपण दोघे टॉप २मध्ये जाऊन घराची लाईट्स बंद करून बाहेर पडायचं. त्यामुळे टॉप ३मध्ये बाहेर पडलो तेव्हा थोडं वाईट वाटलं. पण, स्वीकारायला लागलं की माझा प्रवास इथपर्यंतच होता."

“गौरव जिंकला म्हणजे मीच जिंकलो!”

बाहेर पडल्यानंतर प्रणितनं मनात स्पष्ट ठरवलं होतं की ट्रॉफीवर फक्त एकाच नावाचा हक्क आहे - गौरव खन्ना. तो म्हणतो, "लोकांनी मला जी साथ दिली त्यामुळं मी समाधानी होतो. पण त्यानंतर माझं मत होतं, आता गौरवच जिंकायला हवा. आणि जेव्हा तो जिंकला, तेव्हा मला वाटलं, मीच जिंकलो!"

"गौरव पात्र नाही" - ट्रोल्सवर प्रणितचे उत्तर

गौरव खन्ना शो जिंकण्यास पात्र नव्हता, अशा सोशल मीडियावरील प्रतिक्रियांबद्दल प्रणितनं तिखट पण तर्कशुद्ध उत्तर दिलं. तो म्हणतो, "फॅन्स नेहमी आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकलेलं पाहू इच्छितात. जसं क्रिकेटमध्ये भारतानेच जिंकावं असं वाटतं. पण दुसरा कुणी जिंकलं म्हणजे तो अपात्र होत नाही. गौरवनं काहीतरी केलंय म्हणूनच त्याचे इतके फॅन्स त्याला समर्थन देत होते."

"गौरवमध्ये काही खास गुण आहेत"

प्रणितनं गौरवच्या व्यक्तिमत्त्वातील आवडत्या गोष्टीही सांगितल्या. "गौरव शांत, मॅच्युअर आणि स्वतःच्या पद्धतीने स्टँड घेणारा स्पर्धक आहे. कधी कधी तो बॅकफुटवर खेळतोय असं लोकांना वाटलं, पण मला वाटतं जिंकणाऱ्या स्पर्धकात प्रेरणा देण्याची ताकद हवी आणि गौरव ते करू शकतो."

‘बिग बॉस १९’नंतर प्रणित मोरेचे प्रामाणिक बोल आणि गौरव खन्नाबद्दलचा त्याचा कृतज्ञ आदर, या संपूर्ण प्रवासातली त्यांची मैत्री किती खरी होती याचीच साक्ष देतात.

logo
marathi.freepressjournal.in