Bigg Boss Marathi 5: "तुम्हाला चांगलं वाटतंय तर तुम्ही..." निक्की आणि अभिजीतच्या मैत्रीवर अरबाज भडकला

Nikki Tamboli, Arbaz Patel: निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. अरबाजने याबद्दल आक्षेपही नोंदवला आहे.
Bigg Boss Marathi 5: "तुम्हाला चांगलं वाटतंय तर तुम्ही..." निक्की आणि अभिजीतच्या मैत्रीवर अरबाज भडकला
Published on

Bigg Boss Marathi New Season Day 27: 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनला आता चार आठवडे पूर्ण होत आहेत. गेल्या चार आठवड्यात सदस्यांना 'बिग बॉस मराठी'चा खेळ खऱ्या अर्थाने कळला आहे. आता घरातील सदस्यांची समीकरणेदेखील बदलत आहेत. त्यामुळे या नव्या सीझनची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. आता अभिजीतमुळे निक्की आणि अरबाज यांच्यात दुरावा येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. अरबाजने याबद्दल आक्षेपही नोंदवला आहे. आता 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज निक्कीला म्हणत आहे,"तुम्हाला चांगलं वाटतंय तर तुम्ही एकमेकांसोबत दिवसभर बोला".

Bigg Boss Marathi 5: "तुम्हाला चांगलं वाटतंय तर तुम्ही..." निक्की आणि अभिजीतच्या मैत्रीवर अरबाज भडकला
Bigg Boss Marathi 5: "तू भवऱ्यासारखी फिरतेय..." अरबाजने निक्कीवर केला आरोप; टास्कमुळे पडणार मैत्रीत फूट
Bigg Boss Marathi 5: "तुम्हाला चांगलं वाटतंय तर तुम्ही..." निक्की आणि अभिजीतच्या मैत्रीवर अरबाज भडकला
Bigg Boss Marathi 5: "निक्कीसाठी मी कोणतंही फेव्हर देणार नाही..." निक्की आणि वैभवमध्ये पडली वादाची ठिणगी

निक्की पुढे अभिजीतला म्हणते,"त्याचं म्हणंन हेच आहे की आम्ही सगळे याच्या विरोधात आहोत. तर तू का नाही आहेस?". तर दुसरीकडे अरबाज अंकिताला म्हणतो,"अभिजीत समोर असेल तर कृपया मध्ये येऊ नकोस. आता मी भिडणार". निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला चांगलीच खटकत असल्याचं पाहायला मिळत आहे.

logo
marathi.freepressjournal.in