Bigg Boss Marathi New Season: बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी वरून एक वेगळाच वाद होत असल्याचा पाहायला मिळत आहे. अरबाजने त्याची कॅप्टनसी निक्कीला दिल्यापासून निक्की खूप बदलली आहे असे, अरबाज आणि टीम 'A 'मधल्या बाकी सदस्याचे देखील मत आहे.
या विषयावरूनच अरबाज, वैभव डीपी दादांशी बोलताना दिसत आहे. बिग बॉसच्या नव्या प्रोमोत तूम्ही पाहू शकता की, अरबाज डीपी दादांना म्हणत आहे की," मला कंट्रोल नाही होत आता. मी कॅप्टनसी रूम सोडून बाहेर जात होतो झोपायला. बाथरूम साफ करत होतो, झाडू मारत होतो.
ती मला म्हणते की, माझ्या कॅप्टनसीच्या रूममध्ये येऊ नकोस. माझ्या कॅप्टनसीवर अडथळा निर्माण होऊ शकतो.
मला दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा त्रास नाही होत पण, जे माझ्या समोर घडत आहे ना त्याचा होत आहे आणि ती ते मुद्दमुन करत आहे." यावर डीपी दादा म्हणतात की," तू सोड यावर लक्ष देऊ नको."