Sonakshi Sinha Wedding: झहीर इक्बाल, सोनाक्षी सिन्हा अडकले लग्नबंधनात, नोंदणी पद्धतीने केला विवाह

Zaheer and Sonakshi: हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते व राजकीय नेते शत्रूघ्न सिन्हा यांची कन्या सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांचा विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला.
Sonakshi Sinha Wedding: झहीर इक्बाल, सोनाक्षी सिन्हा अडकले लग्नबंधनात, नोंदणी पद्धतीने केला विवाह
Instagram
Published on

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते व राजकीय नेते शत्रूघ्न सिन्हा यांची कन्या सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांचा विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. या दोघांनीही नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे.

अखेर कुटुंबाच्या आणि जवळच्या मंडळींच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि झहीरने लग्न केले. वांद्रे परिसरात सोनाक्षी आणि झहीरने लग्नगाठ बांधली. तसेच आता त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला अनेकांना आमंत्रित केले असून मुंबईतील दादर परिसरातील बॅस्टियन रेस्टॉरंट येथे पार पडणार आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आता लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Sonakshi Sinha Wedding: झहीर इक्बाल, सोनाक्षी सिन्हा अडकले लग्नबंधनात, नोंदणी पद्धतीने केला विवाह
Sonakshi Sinha: 'माझी मर्जी आहे...' झहीर इक्बालसोबत लग्नाच्या अफवांवर सोनाक्षी सिन्हाने सोडले मौन

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाची बातमी जेव्हापासून समोर आली आहे, तेव्हापासून यावर सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. सोनाक्षी हिंदू आणि जहीर मुस्लिम आहे.

logo
marathi.freepressjournal.in