रजनीकांतच्या मुलीसोबत घटस्फोटानंतर 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करतोय धनुष?

बॉलिवूड असो किंवा साऊथ सिनेइंडस्ट्री, ब्रेकअप्स, लिंकअप्स आणि अफेअर्सच्या चर्चा काही नवीन नाहीत. आता सुपरस्टार अभिनेता धनुषच्या अफेअरच्या चर्चांनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. घटस्फोटानंतर पहिल्यांदाच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अशा गॉसिप्स रंगत आहेत.
रजनीकांतच्या मुलीसोबत घटस्फोटानंतर 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करतोय धनुष?
Published on

बॉलिवूड असो किंवा साऊथ सिनेइंडस्ट्री, ब्रेकअप्स, लिंकअप्स आणि अफेअर्सच्या चर्चा काही नवीन नाहीत. आता सुपरस्टार अभिनेता धनुषच्या अफेअरच्या चर्चांनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. घटस्फोटानंतर पहिल्यांदाच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अशा गॉसिप्स रंगत आहेत.

बर्थडे पार्टीत वाढलं चर्चांचं तापमान

थलायवा रजनीकांत यांचा जावई राहिलेला धनुष, ऐश्वर्यासोबतच्या 18 वर्षांच्या संसाराला 2024 मध्ये पूर्णविराम देऊन सिंगल झाला. नुकताच तो एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या पार्टीला विशेष पाहुणा म्हणून पोहोचल्याने चर्चा रंगल्या आहेत. ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूड आणि साऊथ दोन्हीकडे आपलं नाव कमावलेली मृणाल ठाकूर.

१ ऑगस्ट रोजी मृणालने तिचा वाढदिवस साजरा केला. तिच्या बर्थडे सेलिब्रेशन पार्टीतून समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये धनुष आणि मृणाल हातात हात धरून गप्पा मारताना दिसतात. याआधी 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाच्या प्रीमिअरला देखील दोघे एकत्र दिसले होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, दोघांच्या रिलेशनशिपबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. काही चाहत्यांनी मात्र हे फक्त मैत्रीपूर्ण नाते असल्याचं सांगितलं आहे.

वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, धनुष 28 नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या आनंद एल राय दिग्दर्शित 'तेरे इश्क में' या चित्रपटात कृती सेननसोबत झळकणार आहे. तर मृणाल नुकतीच 'सन ऑफ सरदार 2' मध्ये दिसून आली असून, तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची चाहत्यांना उत्सुकता आहे.

logo
marathi.freepressjournal.in