अभिनेत्री माहिरा शर्माला डेट करतोय एल्विश यादव? व्हायरल व्हिडिओवर दिलं उत्तर -"इतकं सीरियस ..."

‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादव माहिरा शर्मासोबतच्या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आला. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हिडिओमध्ये दोघं एकत्र दिसताच चाहत्यांमध्ये त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं. अखेर वाढत्या चर्चांवर एल्विशनं मौन तोडत एक्सवर प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिलं
अभिनेत्री माहिरा शर्माला डेट करतोय एल्विश यादव? व्हायरल व्हिडिओवर दिलं उत्तर -"इतकं सीरियस ..."
Published on

‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता ठरलेला युट्यूबर एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण ठरलंय त्याचा अभिनेत्री माहिरा शर्मा हिच्यासोबतचा एक व्हिडिओ. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हिडिओमध्ये दोघं एकत्र दिसताच चाहत्यांमध्ये त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं.

व्हिडिओने रंगवल्या चर्चा

एल्विशने माहिरासोबतचा एक व्हिडिओ त्याच्या इनस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यात दोघं एकत्र डान्स करताना दिसले होते. हातात हात घालून एकमेकांकडे प्रेमाने पाहतानाचा त्यांचा हा व्हिडिओ शेअर करताना एल्विशने कॅप्शन दिलं होतं; “रोमँटिक राव साहब”. त्याच्या या पोस्टनंतर महिरा आणि एल्विशच्या नात्याबद्दल चर्चा रंगायला लागल्या. या चर्चांना विराम देत एल्विशने एक्सवर आपली भूमिका स्पष्ट केली.

एल्विशचा खुलासा

अखेर वाढत्या चर्चांवर एल्विशनं मौन तोडत एक्सवर प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिलं - “प्रमोशनल रील आहे मित्रांनो, इतकं सीरियस होऊ नका.”

त्याच्या या स्पष्टीकरणानंतर स्पष्ट झालं की माहिरा आणि त्याच्या नात्याबद्दल सुरू झालेल्या चर्चा केवळ अफवा होत्या.

logo
marathi.freepressjournal.in