प्रत्येक घरातली गोष्ट... ‘घरत गणपती’; चित्रपटाच्या कलाकारांची दैनिक ‘नवशक्ति’च्या कार्यालयास भेट

गणपती उत्सवाच्या आनंददायी सोहळ्याचं आणि घरत कुटुंबातील नात्यांच्या बंधाची गोष्ट घेऊन ‘घरत गणपती’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.
प्रत्येक घरातली गोष्ट... ‘घरत गणपती’; चित्रपटाच्या कलाकारांची दैनिक ‘नवशक्ति’च्या कार्यालयास भेट
विजय गोहिल/ नवशक्ति
Published on

मुंबई : कोकणी माणसाचं आणि गणेशोत्सवाचं अतूट नातं आहे. ‘गणपती’ असा शब्दोच्चार जरी उच्चारला, तरी एक वेगळीच लहर कोकणी माणसाच्या मनाला स्पर्शून जाते. या सणाच्या निमित्ताने नात्यांचे बंध जपत उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी याहून अनोखी संधी असूच शकत नाही. याच गणपती उत्सवाच्या आनंददायी सोहळ्याचं आणि घरत कुटुंबातील नात्यांच्या बंधाची गोष्ट घेऊन ‘घरत गणपती’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.

नुकतीच या चित्रपटाच्या टीमने दैनिक ‘नवशक्ति’च्या कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी चित्रपटाविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

प्रत्येक घरातली गोष्ट... ‘घरत गणपती’; चित्रपटाच्या कलाकारांची दैनिक ‘नवशक्ति’च्या कार्यालयास भेट
Gharat Ganapati: गणरायाच्या आगमनाची गोष्ट दाखवणारा 'घरत गणपती' सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ ही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे. निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ. शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग, आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत. ‘घरत गणपती’ हा मराठी चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

कोकणातल्या सुखवस्तू कुटुंबातील ही गोष्ट

नातेसंबंधातील प्रेम, गोडवा सणांच्या माध्यमातून निश्चितच निर्माण होत असतो. हाच धागा घेऊन सर्वांगसुंदर अशी ‘लंबोदर’ कथा 'घरत गणपती' या चित्रपटात पहायला मिळणार आहे. कोकणातल्या एका सुखवस्तू कुटुंबातील ही गोष्ट आहे. घरातील गणपतीच्या निमित्ताने घरत कुटुंबात घडणाऱ्या सहज-साध्या गोष्टी, ज्यात गमतीजमती आहेत, राग-लोभ आहेत, एकमेकांविषयी वाटणारी माया आहे.

प्रत्येक घरातली गोष्ट... ‘घरत गणपती’; चित्रपटाच्या कलाकारांची दैनिक ‘नवशक्ति’च्या कार्यालयास भेट
Gharat Ganapati: 'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची' गोष्ट… 'घरत गणपती' 'या' दिवशी होतोय प्रदर्शित

साजेशी गाणी

चित्रपटाला साजेशी चार गाणी चित्रपटात असून 'माझा कोकण भारी' आणि 'नवसाची गौराई माझी' या गाण्यांना सोशल माध्यमावर उत्तम प्रतिसाद मिळतोय. श्रद्धा दळवी, समीर सामंत, अलोक सुतार यांनी लिहिलेल्या गीतांना जावेद अली, विशाल ददलानी, अभय जोधपूरकर, सायली खरे, ‘द कोकण कलेक्टिव्ह’ गर्ल्स यांनी स्वरबद्ध केलं आहे.

‘घरत गणपती’ हा कौटुंबिक चित्रपट प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करेल अशी चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर उत्तम कथानक व भव्यदिव्यता दिसेल. नात्यांचा हा प्रवास प्रत्येकाला समृद्ध करेल. - नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, दिग्दर्शक

नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, दिग्दर्शक

logo
marathi.freepressjournal.in