"तुम्हाला कोणताही पक्ष, नेता आवडत नसेल तर..." अभिनेत्री श्रुती मराठेचं मतदारांना आवाहन

Shruti Marathe: अभिनेत्री श्रुती मराठे हिने पुण्यात मतदान केल्यानंतर नागरिकांना मतदान करण्याचे आवाहान केले आहे.
actress shruti marathe vote appeal to voters
@shrumarathe/Instagram

Pune Lok Sabha Election 2024: आज (१३ मे) देशातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशातील ९६ मतदारसंघात मतदान सुरु झालं आहे. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात मतदान सुरु झालं आहे. दरम्यान सामान्य लोकांसह अनेक कलाकार मंडळीही आज मतनदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रुती मराठे हिने नुकतंच पुण्यामध्ये मतदान केलं आहे. यावेळी तिने लोकांना मतदारांना खास आव्हान केलं आहे....

नक्की काय म्हणाली श्रुती मराठे?

मतदान करून बाहेर आल्यावर श्रुती म्हणाली, "मला वाटलं मी सकाळी ७ वाजत येईल आणि मतदान करून जाईल पण इथे ७ वाजता खूप लोक होती. हे बघून छान वाटलं. लोकांनी मतदान केलंच पाहिजे. लोक येत आहेत आणि आज मतदान होत आहे ही संख्या बघून बरं वाटतंय." आधीच्या अनेक ठिकाणी मतदान कमी झालं यावर अभिनेत्री म्हणाली की, " कमी मतदान झालं हे दुर्दैव आहे. लोकांनी मतदान हे केलंच पाहिजे. जरी तुम्हाला कोणताही पक्ष, नेता आवडत नसेल तरीही आपल्याकडे नोटा या पर्याय आहे. त्यामुळे तुम्हाला कोणीही पटत नसेल तर नोटाला वोट द्या. पण भरपूर मतदान करा कारण त्यामुळे खूप फरक पडतो."

काय अपेक्षा आहेत?

"माझ्या खुप अपेक्षा आहेत. मी पुण्याची आहे, पुण्यात वाढलेली आहे. मी पुणे बदलताना बघितलं आहे. पुणे खूप चांगले बदल झाले आहेत. पण अजूनही काम करण्यासाठी भरपूर संधी आहे. पुण्याला अजून छान करायचं नियोजन असेलच. फक्त ज्यांना मत दिलं आहे आणि ते निवडून आले तर त्यांनी आमच्या सगळ्या ईच्छा पूर्ण कराव्यात हीच अपेक्षा आहे.

logo
marathi.freepressjournal.in