फॅन्ससाठी सरप्राईज! श्रीदेवीच्या 'या' गाजलेल्या भूमिकेत जान्हवी कपूर?

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘परम सुंदरी’ चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, जान्हवीच्या अभिनयाचीही भरभरून प्रशंसा होत आहे. याचदरम्यान, चित्रपटसृष्टीत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. श्रीदेवीच्या सुपरहिट..
फॅन्ससाठी सरप्राईज! श्रीदेवीच्या 'या' गाजलेल्या भूमिकेत जान्हवी कपूर?
Published on

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘परम सुंदरी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. २९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला हा रोमँटिक कॉमेडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, जान्हवीच्या अभिनयाचीही भरभरून प्रशंसा होत आहे.

याचदरम्यान, चित्रपटसृष्टीत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. श्रीदेवीच्या सुपरहिट ‘चालबाज’ चित्रपटाचा रीमेक होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विशेष म्हणजे, या बहुचर्चित प्रोजेक्टमध्ये श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आईने लोकप्रिय केलेल्या भूमिकेत जाण्याची संधी मिळाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, जान्हवीला हा प्रोजेक्ट मिळाल्यानंतर ती खूप उत्साहित आहे, पण आईशी होणाऱ्या तुलनेमुळे ती काळजीपूर्वक निर्णय घेणार आहे. ‘चालबाज’ रीमेकबाबत ती आपल्या जवळच्या लोकांशी सल्लामसलत करत आहे आणि सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याची अपेक्षा आहे.

याआधी या रीमेकमध्ये श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र आता जान्हवीचं नाव पुढे आल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

तसेच, जान्हवीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात वरुण धवन, सान्या मल्होत्रा आणि रोहित सराफसह अनेक महत्वाच्या कलाकारांची भूमिका आहे.

logo
marathi.freepressjournal.in