बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या चर्चेत आली आहे. अलीकडेच जान्हवी घाटकोपरमध्ये झालेल्या दहीहंडी उत्सवात सहभागी झाली होती. यावेळी मटकी फोडल्यानंतर तिने “भारत माता की जय” असा नारा दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला, मात्र त्यासोबतच काही लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
कमेंट्समध्ये जान्हवीची खिल्ली उडवली
जान्हवीच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत म्हटलं की, जन्माष्टमीच्या कार्यक्रमामध्ये “भारत माता की जय” का? तर काहींनी तिची खिल्ली उडवत म्हटलं की, तिला बहुतेक स्वातंत्र्यदिन आणि जन्माष्टमीचा गोंधळ झालाय.
ट्रोलर्सना जान्हवीचं चोख प्रत्युत्तर
या सर्व ट्रोलर्सना जान्हवीने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर संपूर्ण व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला भाजप आमदार राम कदम “भारत माता की जय” म्हणताना ऐकू येतात, त्यानंतर जान्हवी देखील तोच नारा देताना दिसते. हा व्हिडिओ शेअर करताना जान्हवीने लिहिलं, “त्यांनी नारा दिल्यावर जर मी बोलले नसते तरी प्रॉब्लेम आणि मी बोलले तरीही व्हिडिओ कट करून मीम व्हायरल केले जातात", असं तिने म्हटलं. तसेच, फक्त जन्माष्टमीलाच नाही तर मी रोज 'भारत माता की जय' म्हणेन, असेही तिने सांगितले.
तिच्या या उत्तरानंतर अनेकांनी तिचं कौतुक केलंय, तर काहींनी पुन्हा ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. आगामी 'परम सुंदरी' चित्रपटाच्या ट्रेलरमधील तिच्या मल्याळम अॅक्सेंटवरूनही तिला लक्ष्य केलं जातं आहे.
दरम्यान, जान्हवी कपूर 'परम सुंदरी'मध्ये एका मल्याळम मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. या रोमान्स -ड्रामा चित्रपटात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट २९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.