सिया-चेतनच्या कथित गुप्त लग्नाच्या चर्चांवर कंगना रणौतचं भाष्य; म्हणाली, 'संयमी आयुष्य जगा, तुरुंगापासून दूर राहाल'

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कथित गुप्त लग्नाच्या चर्चांदरम्यान कंगना रणौतने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत डेटिंग संस्कृतीवर भाष्य केले. जाणून घ्या नेमकं काय म्हणाली.
सिया-चेतनच्या कथित गुप्त लग्नाच्या चर्चांवर कंगना रणौतचं भाष्य; म्हणाली, 'संयमी आयुष्य जगा, तुरुंगापासून दूर राहाल'
सिया-चेतनच्या कथित गुप्त लग्नाच्या चर्चांवर कंगना रणौतचं भाष्य; म्हणाली, 'संयमी आयुष्य जगा, तुरुंगापासून दूर राहाल'
Published on

पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी कथितरित्या गुप्त लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट आणि इतर डिजिटल पुरावे तपासताना या कथित लग्नाचा उल्लेख समोर आल्याचा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला होता. याच वृत्ताचा स्क्रीनशॉट अभिनेत्री कंगना रणौत हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. मात्र, केवळ बातमी शेअर न करता तिने आजच्या डेटिंग संस्कृतीवर भाष्य करत तरुणांना एक खास संदेशही दिला आहे.

डेटिंग संस्कृतीवर कंगनाचं भाष्य

कंगनाने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, डेटिंग ॲप्स, 'घोस्टिंग', 'बेंचिंग', 'क्रम्बिंग', 'डबल-ट्रिपल डिजिट बॉडी काउंट', ड्रग्ज, क्लब्स आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाचा उल्लेख केला आहे. एवढं सगळं असूनही लोक समाधानी नसल्याचं तिने म्हटलं आहे.

तिने पुढे लिहिले, "ध्येय किंवा उद्दिष्ट नसलेली आवड अनेकदा आत्मविनाशाच्या मार्गावर घेऊन जाते. त्यामुळे तुमची ऊर्जा करिअर किंवा एखादं कौशल्य विकसित करण्यासाठी वापरा. तरुणांना माझा सल्ला आहे की, विचार आधुनिक असू द्या; पण जीवनशैली संयमी ठेवा. त्यामुळे तुरुंग, कंटाळा, नकारात्मकता, नैराश्य आणि अशा अनेक संकटांपासून दूर राहता येईल."

कंगना रणौतची इन्स्टाग्राम स्टोरी
कंगना रणौतची इन्स्टाग्राम स्टोरी

कंगनाने तिच्या पोस्टमध्ये सिया गोयल किंवा चेतन चौधरी यांची नावे थेट घेतलेली नाहीत. मात्र, त्यांच्या कथित लग्नाबाबतच्या वृत्ताचा स्क्रीनशॉट शेअर करत ही पोस्ट केल्यामुळे तिचा रोख या प्रकरणाकडे असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

गुप्त लग्नाच्या दाव्यावर पोलिसांचं स्पष्टीकरण

दरम्यान, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी गुप्तपणे लग्न केल्याच्या चर्चांना पुणे ग्रामीण पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी 'फ्री प्रेस जर्नल'शी बोलताना सांगितले की, "सिया आणि चेतन यांच्या लग्नाचा कोणताही पुरावा अद्याप आमच्याकडे नाही. अशा बातम्या कुठून आल्या, याचीही पडताळणी सुरू आहे. पुरावा मिळाल्यास योग्य वेळी माध्यमांना माहिती दिली जाईल."

सिया-चेतनच्या कथित गुप्त लग्नाच्या चर्चांवर कंगना रणौतचं भाष्य; म्हणाली, 'संयमी आयुष्य जगा, तुरुंगापासून दूर राहाल'
'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

सध्या या हत्येप्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिस विविध डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in